JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / गुगलवर फक्त तुम्हाला हवं तेच सापडेल; Google Search करताना ही ट्रिक एकदा वापराच

गुगलवर फक्त तुम्हाला हवं तेच सापडेल; Google Search करताना ही ट्रिक एकदा वापराच

Google Search करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास योग्य गुगल रिझल्ट्स मिळू शकतील. यासाठी काही ट्रिक फायदेशीर ठरतील.

जाहिरात

Google ने पिक्सल युजर्सशिवाय इतर अँड्रॉइड युजर्ससाठीही लॉक्ड फोल्डर फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे फीचर Samsung आणि Oneplus डिव्हाइसमध्ये सुरू झालं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : आजकाल प्रत्येक कामासाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि इंटरनेटचा वापर केला जातो. तसंच कोणत्याही प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी थेट Google Search केलं जातं. एका क्लिकने गुगलवर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण आपल्याला हवं तसाच रिझल्ट किंवा तसंच उत्तर मिळण्यासाठी अनेकदा बराच वेळही जातो. आपल्याला हवी असलेली माहिती किंवा ज्याचं उत्तर हवं आहे, ते लगेच मिळत नाही. त्यामुळे Google Search करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास योग्य गुगल रिझल्ट्स मिळू शकतील. यासाठी काही ट्रिक फायदेशीर ठरतील. - एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधताना Google वर अनेक रिझल्ट्स येतात. परंतु अगदी हवं आहे तसंच उत्तर मिळण्यासाठी अवतरण चिन्हांचा (“ ”) वापर करू शकता. उदा. एखाद्या गाण्याचे लिरिक्स शोधायचे असल्यास सर्च करताना या चिन्हांचा वापर करू शकता. - हवी ती माहिती शोधण्यासाठी Google चे फिल्टर टॅब्स फायद्याचे ठरतात. गुगलवर काहीही सर्च केल्यानंतर खाली काही फिल्टर्स मिळतात. जर एखादा फोटो शोधायचा असल्यास Pototos मध्ये जावू शकता. एखादी जागा असल्यास Maps सिलेक्ट करू शकता. असे तुमच्या सर्चनुसार फिल्टर्स सिलेक्ट करू शकता. - एखाद्या वेबसाइटवर माहिती सर्च करताना सर्चमध्ये प्रश्न किंवा शंका असेल ती टाइप करा आणि पुढे ‘site: वेबसाइटचं नाव’ टाका.

Smartphone चोरी झाला? या नंबरच्या मदतीने पुन्हा मिळवू शकाल, काय आहे IMEI Number

- अनेकदा सर्च करताना एखादा शब्द आठवत नाही किंवा विसरला जातो. अशावेळी जे सर्च करायाचं आहे ते टाकून पुढे जो शब्द आठवत नाही, तिथे ‘*’ या चिन्हाचा वापर करा. यामुळे गुगल हवी ती माहिती शोधण्यास मदत करेल.

लपून-छपून कोण पाहतंय तुमचं Facebook Profile? असं तपासा

- Google वर एखादी फाइल PDF, jpeg सर्च करायची असेल, तर सर्च बारमध्ये जो कंटेंट हवा आहे, तो सर्च करा आणि त्यापुढे ‘filetype: फाइल कॅटेगरी’ टाइप करा. तुम्हाला हवी असलेली योग्य माहिती त्याच फाइल फॉर्मेटमध्ये मिळण्यास मदत होईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या