नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : इंटरनेट (Internet), सोशल मीडियाच्या (Social Media) जगात मनोरंजनासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स मनोरंजनासह कमाईचाही स्त्रोत ठरत आहेत. युजर्स इन्स्टाग्रामवर (Instagram) ब्रँड्ससह कोलॅबोरेट करुन पैसे कमवत आहेत. पण याआधीपासूनच यूट्यूबवर (YouTube) लोक अशाप्रकारे कमाई करत आहेत. यूट्यूबवर व्हिडीओ (YouTube Video) बनवून आणि अपलोड करुन युजर्स कमाई करतात. पण एक अशी पद्धत आहे ज्यात लोक स्वत: व्हिडीओ न बनवताही यूट्यूबवरुन कमाई करत आहेत.
YouTube कमाईचं एक साधन - YouTube मागील अनेक वर्षांपासून पैसे कमावण्याचं एक लोकप्रिय साधन आहे. यूट्यूबवर पैसे कमावण्यासाठी यूट्यूब चॅनेल असणं गरजेचं आहे. हे मोफत बनवता येतं आणि या चॅनेलवर व्हिडीओ (YouTube Channel) बनवून अपलोड करावे लागतात. तुमचे व्हिडीओ किती लोक पाहतात, त्याला किती लाइक्स मिळतात आणि तुमच्या चॅनेलचे किती सब्सक्रायबर्स आहेत याआधारे यूट्यूब पैसे (YouTube Money) देतं. अशारितीने लोक महिन्याला लाखो रुपये कमाई करतात.
व्हिडीओ न बनवता अशी करता येईल कमाई - YouTube वर पैसे कमावण्यासाठी आणखी एक ट्रिक आहे. या ट्रिकचा वापर करुन जगभरातील अनेक लोक यूट्यूबवरुन पैसे कमावतात. असे अनेक युजर्स आहेत दुसऱ्यांनी बनवलेल्या व्हिडीओचा काही भाग काढतात आणि त्याच्या बॅकग्राउंडमध्ये एक वेगळा आवाज किंवा म्यूझिक टाकतात. अशाप्रकारच्या व्हिडीओला YouTube ओरिजनल कंटेंट समजतो. याद्वारे स्वत: व्हिडीओ न बनवताही यूट्यूबद्वारे कमाई करता येते.