नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : सध्याच्या डिजीटल युगात अनेक गोष्टी Internet वर आधारित आहेत. फंड ट्रान्सफर, इतर ऑनलाइन पेमेंट, UPI द्वारे केलं जातं. एखाद्याला पैसे पाठवताना अचानक इंटरनेट कनेक्शन गेलं, तर समस्या येऊ शकते. परंतु यासाठी एक उपाय आहे. विना इंटरनेटही फोनवरुन UPI Payment करता येऊ शकतं. इंटरनेट नसल्यास, नेशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ची *99# ही सुविधा फायद्याची ठरेल. *99# NPCI ची USSD वर आधारित मोबाईल बँकिंग सर्विस आहे. हा सर्विस नोव्हेंबर 2012 मध्ये लाँच करण्यात आली होती. सुरुवातीला ही सर्विस केवळ BSNL आणि MTNL युजर्ससाठीच उपलब्ध होती. महत्त्वाची बाब म्हणजे *99# द्वारे UPI Payment करताना तुमचा फोन नंबर बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्याच फोन नंबरला BHIM APP रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे.
*99# द्वारे कसे पाठवाल पैसे? - सर्वात आधी फोनचा डायल पॅड ओपन करा आणि *99# टाइप करुन कॉलवर टॅप करा. इथे एक नवी विंडो दिसेल, ज्यात 7 ऑप्शन्स असतील. Send Money, Receive Money, Check Balance, My Profile, Pending Requests, Transactions आणि UPI PIN असे ऑप्शन्स असतील. - केवळ पैसे पाठवायचे असल्यास, डायल पॅडवर 1 नंबर दाबून Send Money पर्याय निवडा. त्यानंतर फोन नंबर, UPI ID किंवा अकाउंट नंबर आणि IFSC कोडचा वापर करुन पैसे पाठवा. - त्यानंतर अमाउंट लिहून ट्रान्झेक्शन पूर्ण करण्यासाठी 4 ते 6 अंकी UPI PIN एंटर करा. त्यानंतर Send वर टॅप करा.
काय आहे UPI? यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) UPI एक रियल टाइम पेमेंट सिस्टम आहे, जे मोबाईल App च्या माध्यमातून बँक अकाउंटमध्ये पैसे त्वरित ट्रान्सफर करू शकतं. UPI च्या माध्यमातून तुम्ही बँक अकाउंट अनेक UPI App शी लिंक करू शकतात. तसंच, अनेक बँक अकाउंट एका UPI App शी कनेक्ट करता येतात.