तुमच्या Android फोनमध्ये कोणी कोणतं App वापरलं, हे जाणून घेण्यासाठी तुमच्या Android Phone च्या Dialer मध्ये जा.
इथे *#*#4636#*#* डायल करावं लागेल. हा कोड डायल केल्यानंतर तुमच्या समोर एक मेन्यू ओपन होईल. त्या विंडोचं नाव टेस्टिंग असं आहे.
ही सेटिंग App ची सब-सेटिंग आहे. इथे Usage Statistics पर्यायावर जावं लागेल. इथे अशा सर्व Apps ची लिस्ट दिसेल, ज्याचा तुम्ही वापर केला आहे. Last Time Used मध्ये जाऊन Apps पाहता येतील.
ज्या App चा सर्वात शेवटी वापर करण्यात आला आहे, त्याबाबतही माहिती मिळेल. त्याशिवाय शेवटचं App किती वेळ वापरलं, त्याचा Usage Time ही चेक करता येईल.