JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Gmail चा मेलबॉक्स भरला? नको असलेले मेल कमीत कमी वेळात कसे कराल Delete?

Gmail चा मेलबॉक्स भरला? नको असलेले मेल कमीत कमी वेळात कसे कराल Delete?

आता 1 जूनपासून गुगलची फ्री अनमिलिटेड स्पेप संपली आहे. त्यामुळे तुमच्या जीमेलमध्ये नको असलेले मेल डिलीट करू शकता आणि उगागच भरलेली स्पेस कमी करू शकता.

जाहिरात

गुगल क्रोमवर लॉग-इन केल्यानंतर एक पेज दिसेल. तिथे स्क्रोल करुन View Gmail in: Mobile/ Older version/Desktop दिसेल. आता Desktop वर क्लिक करा. त्यानंतर ज्याप्रमाणे डेस्कटॉपवर gmail दिसतं. तसे सर्व मेल एकत्र दिसतील.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 जून : जगभरात जीमेल (Gmail) एक लोकप्रिय ईमेल सुविधा आहे. कोट्यवधी लोक या सर्विसचा वापर करतात. खासगी आणि ऑफिशियल स्तरावर जीमेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता 1 जूनपासून गुगलची फ्री अनमिलिटेड स्पेप संपली आहे. त्यामुळे तुमच्या जीमेलमध्ये नको असलेले मेल डिलीट करू शकता आणि उगागच भरलेली स्पेस कमी करू शकता. जीमेवर प्रमोशनल मेल्सही येत असतात. त्यामुळे स्टोरेजचा नको असलेल्या मेलसाठी अधिक वापर होतो. जर फ्री स्पेस वाचवायची असेल, तर तुम्ही नको असलेले मेल्स डिलीट करू शकता. Google आता एका अकाउंटसह 15 GB फ्री स्टोरेज देत आहे. या फ्री स्टोरेजमध्ये गुगलच्या सर्व सर्विस Gmail, Google Photos, Google Drive सामिल आहे. म्हणजेच या सर्वांसाठी एकूण मिळून 15 GB स्पेस दिली जाईल. नको असलेले emails कसे डिलीट कराल? - लॅपटॉप किंवा फोनमध्ये जीमेल ओपन करा. - त्यानंतर सर्च बारमध्ये has:attachment larger:10M टाईप करा. यात ते ईमेल दिसतील, ज्याची साईज 10 MB आहे.

(वाचा -  Phone मध्ये आवाज क्लियर येत नाहीये,घसबसल्या अशी सोडवा समस्या;पाहा सोप्या ट्रिक्स )

- जर तुम्हाला 10 MB हून अधिक साईज असलेले ईमेल डिलीट करायचे असल्यास, तुम्ही 10M ऐवजी दुसरी मोठी संख्या लिहू शकता. - सर्च रिझल्टमध्ये सर्व ईमेल्स दिसतील, ज्यांची साईज 10 MB हून अधिक आहे. - आता हे सर्व मेल्स सिलेक्ट करा, जे तुम्हाला डिलीट करायचे आहेत. त्यानंतर डिलीटवर क्लिक करा. - आता ट्रॅश सेक्शनमध्ये एम्टी ट्रॅश बटनवर टॅप करा. अशाप्रकारे ईमेल स्टोरेज क्लिअर करू शकता.

(वाचा -  स्मार्टफोनमध्ये हॉटस्पॉटचा वापर करताय? हे तोटे माहित आहेत का? )

जर कोणतेही प्रमोशनल, फालतू मेल्स नको असतील, तर त्यासाठी नको असलेले, प्रमोशनल ईमेल्स अनसब्सक्राईब करू शकता. त्यानंतर जुने मेसेज डिलीट करा. प्रमोशनल ईमेल सर्विस अनसब्सक्राईब केल्यानंतर, ईमेल बंद होण्यास काही वेळ लागू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या