नवी दिल्ली, 27 मार्च : कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास, काही प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास थेट गुगल सर्च (Google Search) केलं जातं. गुगल क्रोमवर (Google Chrome) काही टाइप करत असताना अनेक संभावित पर्याय सुचवले जातात. हे संभावित पर्याय असे असतात, जे इतर युजर्सद्वारे सर्च केलेले असतात किंवा एखाद्यावेळी आधी तुमच्याकडूनही सर्च केलेले असू शकतात. अनेकदा आपण Chrome वर टाइप करत असताना गुगलकडून दिले जाणारे पर्याय फायदेशीर ठरतात. परंतु काही वेळा हे त्रासदायकही ठरू शकतं. परंतु गुगल क्रोम ब्राउजरमध्ये (Google Chrome Browser) एका सेटिंगद्वारे तुम्ही ही Google Suggestion सुविधा बंदही करू शकता. Google Setting मध्ये बदल करुन सर्च सजेशन (Google Search Suggestion) पर्याय बंद करता येतो.
Google Suggestion बंद करण्याचा फायदा म्हणजे तुम्ही काय सर्च करत होतात यापासून मेन सब्जेक्ट भरकटत नाही. गुगलकडून पर्यायी सर्च आल्याने अनेकदा आपण काय सर्च करत होतो हे विसरतो आणि दुसऱ्या इतर गोष्टी शोधल्या जातात. त्यामुळे Google Suggestion बंद करू शकता. युजर्स Google Chrome वर ऑटो फील ऑप्शन मॅनेज (Autofill Chrome) करू शकतात. सोप्या पद्धतीने सर्च सजेशन डिसेबल करू शकता.
- सर्वात आधी Chrome ब्राउजरच्या वर उजव्या बाजूला तीन डॉट्सवर क्लिक करा. - आता ड्रॉपडाउन मेन्यूमध्ये सेटिंग्सवर टॅप करा. - आता Sync and Google Services वर क्लिक करा. - स्क्रोल डाउन करा आणि Sync and Google Services साठी टॉगल बंद करा. - एकदा यावर क्लिक केल्यानंतर टॉगल बंद होईल. त्यानंतर तुम्ही Google Chrome वर काहीही सर्च करायला सुरुवात केली तरी Google तुम्हाला Suggestion देणं करेल.