JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / पर्सनल डेटा लीक करणाऱ्या Fake Websites कशा ओळखाल? पाहा सोपी पद्धत

पर्सनल डेटा लीक करणाऱ्या Fake Websites कशा ओळखाल? पाहा सोपी पद्धत

Online सर्व कामांवेळी वेबसाइट योग्य असणं, ऑथेंटिक असणं गरजेचं आहे, जेणेकरुन हॅकर्सकडून युजरच्या माहितीचा चुकीचा वापर होऊ शकतो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : आजच्या डिजीटल जगात अनेक कामं ऑनलाइन केली जातात. पैसे ट्रान्सफर करणं, KYC, वेरिफिकेशन, बँकेसंबंधी अशी अनेक कामं ऑनलाइन केली जातात. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, शॉपिंग अशा गोष्टी वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात केल्या जातात. पण या सर्व कामांवेळी वेबसाइट योग्य असणं, ऑथेंटिक असणं गरजेचं आहे, जेणेकरुन हॅकर्सकडून युजरच्या माहितीचा चुकीचा वापर होऊ शकतो. कनेक्शन तपासणं महत्त्वाचं - वेबसाइटचा वेब अॅड्रेस तपासणं गरजेचं आहे. ‘HTTP’ आणि ‘HTTPS’ मधील फरक चेक करणं महत्त्वाचं ठरतं. ‘HTTPS’ साइट सिक्योर असते. ‘HTTP’ वेबसाइटमध्ये डेटा सुरक्षित सेफ नसतो. ‘HTTP’ अर्थात hypertext transfer protocol वेबसाइट ऑन डिमांड कनेक्शन बनवते. अशा वेबसाइट तुमचं कनेक्शन सुरक्षित करण्यास वेळ घेत नाही, त्यामुळे युजरचा डेटा सुरक्षित राहत नाही.

ना पॉकेटमध्ये ठेवण्याचं टेन्शन, ना हरवण्याची भीती; e-PAN Card असं करा डाउनलोड

‘HTTPS’ Secure Sockets Layer किंवा Transport Layer Security चा उपयोग करुन युजरचं कनेक्शन एन्क्रिप्ट करतं. म्हणजेच ट्रान्सफर केलेला डेटा तुमच्या आणि रिसीवींग पार्टीमध्येच राहतो. याला कोणी हॅकर, स्कॅमर रीड करू शकत नाही. वेबसाइट फेक आहे की नाही हे तपासण्यासाठी वेबसाइटच्या पेजवरील कंटेंटची क्वालिटीही तपासणं महत्त्वाचं ठरतं.

Twitter CEO Parag Agrawal यांचा CV व्हायरल, मोठी बाब उघडकीस

Google करू शकतं मदत - Google Safe Browsing Transparency Report तुम्हाला असली आणि नकली वेब अॅड्रेस ओळखण्यास मदत करतो. इथे केवळ वेब अॅड्रेस पेस्ट करावा लागेल आणि गुगल स्कॅन करुन तुम्हाला वेब अॅड्रेस असली की नकली याची माहिती देईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या