नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : व्हॉट्सअॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप नेहमी आपल्या अॅपमध्ये नवनवे फीचर्स जोडत असतं. अॅपमध्ये काही असे फीचर्स आहेत, ज्यात बदल करता येत नाही. अशा बदल करता न येणाऱ्या फीचरमध्ये व्हॉट्सअॅप फाॉन्टचा समावेश आहे. व्हॉट्सअॅप लाँच झाल्यापासून एकच फॉन्ट दिसतो. पण एका ट्रिकद्वारे हा जुना फॉन्ट बदलता येऊ शकतो. व्हॉट्सअॅपचा फॉन्ट इटॅलिक आणि बोल्ड करता येऊ शकतो आणि तुमचा चॅटिंग एक्सपिरिएन्स अधिक मदेशीर करता येऊ शकतो. इटॅलिक फॉन्ट - जर तुम्हाला फॉन्ट इटॅलिक करायचा असेल, तर टेक्स्टच्या सुरुवातीला आणि शेवटी अंडरस्कोर साइन ठेवावं लागेल. उदा. मेसेज _TEST_ या फॉर्मेटमध्ये लिहू शकता.
बोल्ड - चॅटिंगवेळी एखादा मेसेज बोल्ड करायचा असल्यास, मेसेजच्या सुरुवातीला आणि शेवटी स्टार लावावा लागेल. उदा. मेसेज *TEST* या असा लिहावा लागेल. WhatsApp वर एकाच वेळी फोटो, ऑडिओ, व्हिडीओ, व्हाईस कॉल, व्हिडीओ कॉल, पेमेंट अशा अनेक गोष्टी करता येत असल्याने व्हॉट्सअॅपचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. यात चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असल्याने ते सुरक्षित राहतात.
WhatsApp मध्ये टू-स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करुन सिक्योरिटी वाढवता येते. या टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे ज्यावेळी नव्या फोनवर, डिव्हाईसवर WhatsApp रजिस्टर केलं जाईल, त्यावेळी पिन मागितला जातो. त्यामुळे ही सेटिंग फायदेशीर ठरते. Two-Step Verification ऑन करण्यासाठी अकाउंट सेटिंगमध्ये, टू-स्टेप व्हेरिफिकेशनवर जाऊन सहा अंकी पिन कोड सेट करा. रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येऊ शकतो.