JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / इंग्रजीच नाही, तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

इंग्रजीच नाही, तर आता तुमच्या भाषेतही बनवता येणार Aadhaar Card, जाणून घ्या सोपी प्रोसेस

UIDAI ने आता आधार कार्ड प्रादेशिक भाषांमध्ये बनवण्याची सुविधा सुरू केली आहे.

जाहिरात

Aadhar card update

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. प्रत्येक खासगी आणि सरकारी कामासाठी आधार कार्डची गरज लागते. अधिकतर आधार कार्डवर प्रिंटिंग इंग्रजी भाषेत असते. परंतु UIDAI ने आता आधार कार्ड प्रादेशिक भाषांमध्ये बनवण्याची सुविधा सुरू केली आहे. आता युजर्स आधार कार्ड इंग्रजी, आसाम, उर्दू, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, हिंदी, बंगाली, उडिया, गुजराती या भाषांमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. आधार कार्डमध्ये भाषा बदलण्यासाठी ऑनलाईन अर्जही करता येऊ शकतो. आधार कार्डमध्ये भाषा बदलण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागेल. आधार कार्डमध्ये नव्या भाषेसाठी अपडेट रिक्वेस्ट सबमिट होईल त्यानंतर नवीन आधार कार्ड डाउनलोड करता येईल. आधार कार्डमध्ये भाषा अपडेट होण्यासाठी जवळपास 1 ते 3 आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. आधार सेवा केंद्रातही आधार कार्डमधील भाषा बदलता येऊ शकते.

PUC कडे लक्ष न देणं पडेल भारी, RC सस्पेंडसह भरावा लागेल दंड; जाणून घ्या नवा नियम

ऑनलाईनद्वारे आधार कार्डमध्ये भाषा अपडेट करण्यासाठी - - आधार कार्डमध्ये अपडेट करण्यासाठी अधिकृत वेबसाईट https://uidai.gov.in/ वर भाषेत बदल करता येऊ शकतात. - इथे Check online demographics update status वर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर 12 अंकी आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाकून ओटीपीवर क्लिक करावं लागेल. - रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर 6 अंकी वन-टाईम पासवर्ड येईल. ओटीपी टाकून, लॉगइनवर क्लिक करावं लागेल. - त्यानंतर ज्या भाषेत आधार कार्ड हवं असेल, त्या भाषेवर क्लिक करा. पुढील प्रोसेस फॉलो करत, अर्ज सबमिट करा. - Preview करुन संपूर्ण माहिती तपासता येईल. मोबाईलवर पुन्हा OTP येईल, त्यानंतर पुढील प्रोसेस करावी लागेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या