नवी दिल्ली, 28 मार्च : गुगल मॅपवर Google Maps वर जर तुम्ही एखाद्या जागेला जोडू इच्छित असाल, तर कंपनी याची सुविधा देते. यात तुम्ही तुमचं दुकान, शोरुमही जोडू शकता. त्याशिवाय आणखी एखादी जागा मॅपवर असावी असं वाटत असेल, तर ती जागादेखील जोडता येऊ शकते. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही मिसिंग प्लेस गुगल मॅपवर टाकू शकता. अँड्रॉईड फोनमध्ये गुगल मॅपवर एखादी जागा अशी करा अॅड - - सर्वात आधी अँड्रॉईड फोन किंवा टॅबलेटमध्ये गुगल मॅपचं अॅप ओपन करा. - सर्वात खाली कंट्रीब्यूट हा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करा. - कंट्रीब्यूट पर्यायात गुगल मॅपवर देण्यात आलेले रिव्ह्यू दिसतात.
- येथे अॅड प्लेस हा ऑप्शन दिसेल. त्यावर टॅप करा. - त्यानंतर काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरं द्यावी लागतील.
- सर्वात आधी ज्या प्लेसला गुगल मॅपवर अॅड करायचं आहे, त्याचं नाव टाका. - त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करा. - लोकेशनच्या ऑप्शनमध्ये मॅन्युअली किंवा मॅपवर सिलेक्ट करुन लोकेशन टाकू शकता. - त्यानंतर त्या प्लेसचा नंबर असल्यास तो टाका. येथे एखादं दुकान-शॉप सुरू होण्याची वेळही (Working Hours) टाकू शकता. संपूर्ण माहिती टाकल्यानंतर सबमिट करा. गुगल मॅपवर हे अपडेट दिसण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागू शकतो.
- 15 दिवसांनंतरही हे अपडेट मॅपवर दिसले नाही, तर तुमच्या मित्रांच्या अकाउंटमधूनही ही प्रोसेस करू शकता. जेणेकरुन अधिकाधिक रिस्पान्स गुगलपर्यंत पोहोचेल. अधिक रिस्पान्स आल्यास, ही प्रोसेस जलद होते. त्यानंतर तुमची मिसिंग जागाही मॅपवर दिसू लागेल.