JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google Pay द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतात? जाणून घ्या ट्रान्सफरबाबतचा हा नियम

Google Pay द्वारे एका दिवसात किती पैसे पाठवता येतात? जाणून घ्या ट्रान्सफरबाबतचा हा नियम

UPI मोडमध्ये केल्या जाणाऱ्या पेमेंट्ससाठी काही मर्यादा आहेत. याबाबत अनेक युजर्सला माहिती नसते. अशात आपण ज्या यूपीआयचा वापर करत आहोत, त्याची ट्रान्सफर लिमिट माहित असणं गरजेचं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 जुलै: कोरोना काळात डिजीटल व्यवहारात (Digital Transaction) मोठी वाढ झाली आहे. अनेक जण गुगल पे (Google Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm) आणि इतर Apps चा वापर करुन ऑनलाईन पेमेंट (Online Payment) करतात. परंतु UPI मोडमध्ये केल्या जाणाऱ्या पेमेंट्ससाठी काही मर्यादा आहेत. याबाबत अनेक युजर्सला माहिती नसते. अशात आपण ज्या यूपीआयचा वापर करत आहोत, त्याची ट्रान्सफर लिमिट माहित असणं गरजेचं आहे. जर युजरने खालीलपैकी कोणतंही काम केल्यास, तो त्याचं दररोजचं ट्रान्सफर लिमिट पूर्ण करतो. सर्व UPI Apps द्वारे एक लाख रुपयांहून अधिक पैसे पाठवण्याचा प्रयत्न केल्यास हे लिमिट पूर्ण होतं. जर एखाद्याने 2000 रुपयांहून अधिकची रिक्वेस्ट केल्यासही ट्रान्सफर लिमिट पूर्ण होऊ शकते. युजरच्या बँक अकाउंटनुसार गुगल पेसाठीचं लिमिट वेगवेगळंही असू शकतं. काही वेळा अधिक पैसे पाठवण्यासाठी दुसऱ्या दिवसाची वाट पाहावी लागू शकते.

(वाचा -  विना कॉन्ट्रिब्यूशनदेखील PF खात्यावर मिळू शकतं व्याज; कधी आणि कसं? पाहा डिटेल्स )

ट्रान्झेक्शनमध्ये अडथळे आल्यास - युजरला फ्रॉडपासून (Online Transaction Fraud) वाचवण्यासाठी काही ट्रान्झेक्शन रिव्ह्यू करण्यासाठी रोखले जाऊ शकतात. जर युजरने दररोजचं लिमिट एक लाख पूर्ण केलं नसेल आणि तरीही ट्रान्झेक्शनमध्ये समस्या येत असल्यास युजर गुगल पे सपोर्टशी (Google Pay Support) संपर्क करू शकतात. एक रुपयाहून कमी ट्रान्झेक्शन करता येणार नाही आणि सतत एरर मेसेज दिसत राहील.

(वाचा -  UIDAI Alert! तुमचं Aadhaar Card बनावट तर नाही ना? असं तपासा )

काही बँक दररोजचं UPI ट्रान्झेक्शन लिमिट एक लाखाहून कमीदेखील ठेऊ शकतात. अशावेळी बँकेत जाऊन UPI ट्रान्झेक्शन डेली लिमिटबाबत माहिती घेणं गरजेचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या