नवी दिल्ली, 31 मे : तुमचं आधार कार्ड (Aadhaar Card) बँक अकाउंटशी लिंक आहे का? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे असेल. पण एखादं बनावट, फेक अकाउंट तुमच्या Aadhaar शी लिंक आहे का? याचं उत्तर मात्र देता येणार नाही. आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट्सचे वेळोवेळी अपडेट येत असतात. कोणत्याही बँक फ्रॉडपासून वाचण्यासाठी KYC अपडेट असणं अनिवार्य आहे. बँक खातं लिंक नसल्यास, ते फ्रीज केलं जातं. त्यानंतर तुम्ही कोणतेही फायनेंशियल ट्रान्झेक्शन करू शकणार नाही. त्यामुळे तुमचं आधार कार्ड, बँक अकाउंटशी लिंक करणं आवश्यक आहे. जर लिंक केलं असेल, तर बँक अकाउंट नक्की लिंक झालं की नाही तेदेखील पाहणं गरजेचं आहे. तुमचे एकाहून अधिक बँक अकाउंट असल्यास, सर्व अकाउंट्स एका आधारशी जोडू शकता. तुमच्या आधार कार्डशी किती अकाउंट लिंक आहेत, हे समजल्यास फायनेंशियल ट्रान्झेक्शनमध्ये समस्या येणार नाही, तसंच कोणतंही फेक, बनावट अकाउंटही जोडलं जाणार नाही.
अनेकदा एकाच आधार कार्डशी अनेक फेक अकाउंट जोडली गेल्याचं, समोर आलं आहे. त्यामुळे तुमच्या आधारशी कोणतं बनावट अकाउंट जोडलेलं नाही ना? हे वेळोवेळी तपासणंही गरजेचं आहे. याबाबतची माहिती UIDAI Website वर मिळू शकते.
- UIDAI च्या अधिकृत वेबसाईट www.uidai.gov.in वर जावं लागेल. - आता मेन पेजवर MY Aadhaar वर क्लिक करा. - आता नवं पेज Aadhaar Service वर जावं लागेल. - त्यानंतर Check Aadhaar/Bank Linking पर्यायावर क्लिक करा. - Check Aadhaar/Bank Linking वर क्लिक केल्यानंतर नवं पेज ओपन होईल. - नव्या पेजवर आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. - त्यानंतर OTP टाकून, लॉगइनवर क्लिक करावं लागेल. - आता नवं पेज ओपन होईल आणि तुमच्या आधारशी कोणतं बँक अकाउंट लिंक आहे, हे समजेल.