JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Google मेसेजमध्ये मिळणार नवं फीचर; OTP मेसेज आपोआप होणार डिलीट

Google मेसेजमध्ये मिळणार नवं फीचर; OTP मेसेज आपोआप होणार डिलीट

Google मेसेजमध्ये वन-टाईम पासवर्ड अर्थात OTP मेसेज आपोआप हटवण्यासाठीचा पर्याय मिळेल.

जाहिरात

काही सोप्या टिप्सने युजर गुगल सर्च हिस्ट्रीला (Google Search History) पासवर्ड (Password) ठेऊ शकतात. यामुळे कोणी काही बघेल याची भीतीही नसेल आणि तुम्हीही सुरक्षित राहाल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 30 जून : गुगल (Google) प्रत्येक वेळी अपग्रेड होत असतं. आता गुगल आपल्या गुगल मेसेजला अपग्रेड करत आहे. गुगल मेसेज अ‍ॅपमध्ये दोन विशेष सुविधा लवकरच युजर्सला मिळणार आहेत. यात युजरला पर्सनल आणि व्यवहाराचे मेसेज वेगवेगळे करण्यात मदत करेल. गुगल मेसेज, स्टॉक आणि नियर-स्टॉक अँड्रॉईड फोनवर चालतं. गुगल मेसेज अ‍ॅप आता अनेक मेसेजेस अनेक श्रेणीमध्ये सॉर्ट करण्यासाठी सक्षम असेल. मशिन लर्निंगच्या आधारे ही सॉर्टिंग केलं जाईल. Google मेसेजमध्ये वन-टाईम पासवर्ड अर्थात OTP मेसेज आपोआप हटवण्यासाठीचा पर्याय मिळेल. हे मेसेज 24 तासांनंतर हटवले जातील, जेणेकरुन युजर्सला ते मेसेज मॅन्युअली हटवण्यासाठी अधिक वेळ लागू नये. ओटीपी मेसेजला ऑटो डिलीट इनेबल करण्यासाठी युजर्सला मेसेज अ‍ॅपमध्ये ओटीपी कॅटेगरी अंतर्गत बदल करावे लागतील. अँड्रॉईड फोन - गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काही आठवड्यात भारतात अँड्रॉईड 8 आणि नव्या अँड्रॉईड फोनवर हे फीचर रोलआउट करणार आहे. मेसेजवर नवं टूल ऑप्शनल असणार आहे आणि ते सेटिंगद्वारे बदलता येऊ शकतं.

(वाचा -  Google वर या गोष्टी सर्च करण्याची चूक करू नका, तुरुंगात जाण्यासह बसेल मोठा फटका )

नेटवर्क नसल्यासही मेसेज मिळतील - मागील वर्षी गुगलने आपल्या मेसेज अ‍ॅपसाठी रिच कम्युनिकेशन सर्विस स्टँडर्डची (RCS) घोषणा केली होती, ज्याने अ‍ॅपलच्या आय मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्रामसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅपविरोधात स्पर्धा करण्यासाठी या प्लॅटफॉर्मला अपग्रेड केलं. RCS चा फायदा असा की, तो सेल्युलर नेटवर्क कनेक्टिव्हिटी आवश्यक असलेल्या पारंपरिक SMS ऐवजी वाय-फाय किंवा मोबाईल डेटावर मेसेज पाठवू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या