नवी दिल्ली, 21 मार्च : तुम्ही गुगल क्रोम (Google Chrome) युजर असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. गुगल क्रोम युजर्ससाठी एक हाय रिस्क वॉर्निंग जारी करण्यात आली आहे. IT मंत्रालयाअंतर्गत भारतीय कंप्यूटर इमरजेन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-In) Google Chrome Browser साठी अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Google Chrome मध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. यात रिमोटली हॅकर्सला कोड टाकण्यासाठी, सुरक्षा ब्रेक करण्यासाठी किंवा टार्गेटेड सिस्टमवर सर्विस अटी-शर्तींना नकार देण्यास परवानगी देऊ शकतं, अशा त्रुटी आढळल्या आहेत. Google Chrome चा हा धोका अशा युजरला आहे जे 99.0.4844.74 हून आधीच्या ब्राउजरच्या वर्जनचा उपयोग करत आहेत. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी CERT-In ने गुगल क्रोम युजर्सला Google Chrome 99.0.4844.74 वर्जनमध्ये अपडेट करण्याचं सांगितलं आहे. हे वर्जन नुकतंच रोल आउट केलं गेलं असून यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. Google Chrome शिवाय Microsoft Edge मध्ये काही समस्या आढळल्या आहेत. यातही रिमोट हॅकर टार्गेट सिस्टमला अटी-शर्तींना नकार देण्यास परवानगी देऊ शकतं. खास रुपात तयार केलेल्या रिक्वेस्टद्वारे हॅकर्स याचा फायदा घेत आहेत आणि युजर्सच्या कंप्यूटर, लॅपटॉपला टार्गेट करत आहेत. हॅकर्स याचा फायदा घेऊन सायबर अटॅक, ऑनलाइन फ्रॉड करू शकतात.
CERT-In नुसार, या त्रुटीचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. हॅकर्स युजरला रिमोटली निशाणा बनवू शकतात. त्यासाठी युजर्सला हॅकर्स स्पेशल क्रॉफ्टेड लिंक किंवा वेबसाइटवर क्लिक करायला सांगतात. युजरने लिंकवर क्लिक केल्यानंतर अटॅकर्स रिमोटली सिक्योरिटी रिस्ट्रिक्शन मोडून हवी ती माहिती मिळवतात.
दरम्यान, CERT-In ने Mozila Firefox ब्राउजर युजर्सलाही अलर्ट केलं आहे. CERT-In ने अलर्ट करत युजर्सला Mozilla Firefox वर्जनचं लेटेस्ट Firefox 98, Firefox ESR 91.7 आणि Thunderbird 91.7 लगेच अपडेट करण्याचं सांगितलं आहे. मल्टीपल बगमुळे Mozilla Firefox चं जुनं वर्जन वापरणाले युजर्स सुरक्षित नाहीत. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर आपलं Mozilla Firefox ब्राउजर लेटेस्ट वर्जनमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे.