नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : डिजीटल तंत्रज्ञान आणि स्मार्टफोनच्या या काळात सायबर चोरी (Cyber Crime) एक सामान्य बाब झाली आहे. हॅकर्स (Hackers) अनेक Apps च्या सिक्योरिटी सिस्टम्सला डिसरप्ट करुन युजर्सचा डेटा अॅक्सेस करतात. नुकतंच देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (Ministry of Electronics and Information Technology) (MeitY)) इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (CERT-IN) गुगल क्रोमच्या (Google Chrome) सर्व युजर्सला इशारा दिला आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने गुगल क्रोमचा वापर करणाऱ्या युजर्सला अनेक समस्या आणि वल्नरेबिलिटी समोर आल्याचा इशारा दिला आहे. यामुळे कोणत्याही हॅकरला सायबर अटॅक करण्याची सहज संधी मिळते आणि यापासून सावध राहणं अतिशय गरजेचं आहे. तसंच या धोक्याची लेवल हाय असल्याचंही सांगण्यात आलं आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने दिलेल्या माहितीनुसार, या धोक्यामागे असे प्लॅटफॉर्म्स आहेत, ज्यांचा गुगल क्रोमवर वापर केला जातो. सेफ ब्राउजिंग, रीडर्स मोड, वेब सर्च, थंबनेल टॅब स्ट्रिप, स्क्रिन कॅप्चर, पेमेंट्स, एक्स्टेन्शन्स, स्क्रोल इत्यादी प्लॅटफॉर्म्स आणि फीचर्सचा वापर Google Chrome च्या सुरक्षिततेला धोका वाढवतो.
लगेच करा हे काम - या धोक्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. Google ने एक नवं अपडेट जारी केलं आहे, जे या समस्येसह 27 इतर सुरक्षा समस्यांचं निराकरण करते. त्यामुळे हे नवं अपडेट डाउनलोड करणं फायद्याचं ठरेल. जर तुम्ही विंडोज (Windows) युजर असाल, तर तुमच्यासाठी Chrome 98.0.4758.80/81/ 82 अपडेट जारी करण्यात आलं आहे. तसंच जर तुम्ही मॅक किंवा लिनक्स युजर असाल, तर तुमच्यासाठी Chrome 98.0.4758.80 अपडेट जारी करण्यात आलं आहे.
दरम्यान, कंपनीने गुगल क्रोमच्या लोगोमध्ये (Google Chrome Logo) बदल केले आहेत. काही दिवसांत हा बदललेला Logo पाहायला मिळेल. 2014 नंतर पहिल्यांदा क्रोम आपल्या लोगोमध्ये बदल करत आहे. गुगल क्रोमचे एक डिझायनर एल्विन हू यांनी ट्विटरवर रिडिझाइन लोगोचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.