Google Chrome युजर्स, सावधान! सरकारी एजन्सीनं दिला सावधगिरी बाळगण्याचा इशारा
मुंबई, 21 ऑगस्ट: गुगल क्रोम (Google Chrome Alert) हे अतिशय लोकप्रिय वेब ब्राउझर आहे. आता गुगल क्रोमच्या वापरकर्त्यांना इशारा देण्यात आला आहे. भारत सरकारच्या एका एजन्सीनं हा इशारा दिला आहे. रिपोर्टनुसार, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं (CERT-In) युजर्सना एक चेतावणी दिली आहे. ही चेतावणी Google Chrome डेस्कटॉप वापरकर्त्यांसाठी देण्यात आली आहे. गुगल क्रोममध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. याच्या मदतीनं हॅकर्स तुमच्या संगणकावर सहजपणे ताबा मिळवू शकतात." target="_blank"> मुळं हल्लेखोरांना सुरक्षा निर्बंध तोडू शकतात. CERT-In IT मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. गुगल क्रोममध्ये अनेक कारणांमुळे या त्रुटी असल्याचं सायबर एजन्सीनं सांगितलं आहे. याचा फायदा घेऊन हॅकर्स टार्गेटेड सिस्टीमला खास विनंत्या पाठवू शकतात. तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे. याबाबत सरकारी एजन्सीनं इशारा दिला आहे. गुगल क्रोममध्ये आढळलेल्या त्रुटीचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. याद्वारे ते तुमच्या डिव्हाइसचा अॅक्सेस देखील घेऊ शकतात. त्यामुळं हॅकर्स ऑर्बिटर कोड कार्यान्वित करू शकतात. हे संबंधित सिस्टीमच्या सुरक्षा निर्बंधांना ओलांडू शकतात. CVE-2022-2856 दोष खूप वेगानं पसरत आहे. तथापि, एक चांगली गोष्ट म्हणजे कंपनीनं माहिती मिळताच या त्रुटी दूर केल्या आहेत. हेही वाचा: Cheapest car in India: ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त कार, किंमत 3 लाखांपेक्षा कमी असे रहा सुरक्षित- यासाठी वापरकर्त्यांनी त्यांचे Google Chrome अॅप तात्काळ नवीनतम आवृत्तीवर अपडेट करणं आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही गुगल क्रोमचं जुनं डेस्कटॉप व्हर्जन वापरत असाल, तर तुम्ही हे पॅचेस त्वरित लागू करावेत. CERT-In ने यापूर्वी Apple iOS, iPadOS आणि macOS मध्ये आढळलेल्या बग्सबाबत चेतावणी दिली होती. याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. या उपकरणांमध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे, सायबर गुन्हेगारांना तुमच्या खास फाईल्स मिळू शकतात. वापरकर्त्यांना ही डिव्हाईस तात्काळ अपडेट करण्यास सांगण्यात आलं आहे.