नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : जगभरात कोट्यवधी युजर्स गुगल क्रोम (Google Chrome) ब्राउजरचा वापर करतात. आता कंपनीने गुगल क्रोमच्या लोगोमध्ये (Google Chrome Logo) बदल केले आहेत. काही दिवसांत हा बदललेला Logo पाहायला मिळेल. 2014 नंतर पहिल्यांदा क्रोम आपल्या लोगोमध्ये बदल करत आहे. गुगल क्रोमचे एक डिझायनर एल्विन हू यांनी ट्विटरवर रिडिझाइन लोगोचा फर्स्ट लूक शेअर केला होता. त्याशिवाय त्यांनी लोकांना लोगोमधील अतिशय लहान-लहान बदलांबाबतही माहिती दिली.
नव्या लोगोमध्ये काय होणार बदल? जुन्या लोगोमध्ये प्रत्येक रंगाच्या बॉर्डरवर शॅडो होती, ती आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॉर्डरमुळे लाल, पिवळा आणि हिरवा रंग सपाट दिसत होता. पण आता नव्या लोगोमध्ये हे रंग उठावदार दिसत आहेत. मधला निळा सर्कल मोठा दिसत असून अधिक डार्कही दिसतो आहे.
कोणत्या डिव्हाइसवर कसा दिसेल नवा लोगो - Chrome Logo सर्व सिस्टममध्ये समान दिसणार नाही. Chrome OS वर इतर सिस्टम आयकॉनच्या तुलनेत अधिक रंगीत दिसेल. तर विंडोज 10 आणि विंडोज 11 वर्जनमध्ये अधिक ड्रॅमेटिक ग्रेडिएंट दिसेल, जेणेकरुन इतर विंडोज आयकॉनसह हा नवा लोगो फिट होऊ शकेल. काही महिन्यांमध्ये हा नवा लोगो दिसण्यास सुरुवात होईल.
दरम्यान, Google ने Chrome चं नवं अपडेट रिलीज केलं आहे. गुगल क्रोम ब्राउजरच्या मागील वर्जनमध्ये 26 समस्या आढळल्या होत्या. त्यामुळे युजर्सची पर्सनल माहिती सायबर क्रिमिनल्सपर्यंत (Cyber Criminals) पोहोचू शकत होती. त्यामुळे मोठ्या सायबर अटॅकचा (Cyber attack) धोका निर्माण होतो.
गुगलने क्रोम ब्राउजरसाठी (Google Chrome Browser) लेटेस्ट वर्जन 97.0.4692.99 रोल आउट केलं आहे. ज्यात मागील वर्जनमध्ये मिळेलल्या 26 समस्या फिक्स केल्या गेल्या आहेत. गुगल क्रोमचं नवं वर्जन आतापर्यंतचं सर्वात सिक्योर वर्जन आहे. जर तुम्हीही आपल्या स्मार्टफोन, डेस्कटॉप, टॅबलेटमध्ये क्रोमचं जुनं वर्जन वापरत असाल, तर ते लगेच अपडेट करण्याची गरज आहे. काही सोप्या स्टेप्सने तुम्ही Google Chrome अपडेट करू शकता.