नवी दिल्ली, 2 मार्च : कोरोना काळात जवळपास दोन वर्ष अनेकांना घरातच काढावी लागली. यामुळे आउटडोअर अॅक्टिव्हिटी, जीमसारख्या गोष्टी बंद झाल्या. फिटनेस प्रेमींसाठी हा अतिशय कठीण काळ ठरला. परंतु असे काही Apps आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या स्वत:ला फिट ठेवू शकता. हे Apps फ्री असून फायदेशीर आहेत. Google Fit - हे App अतिशय पॉप्युलर असून आतापर्यंत 10 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. या App मध्ये तुमच्या स्टेप्स काउंट होण्यासह हृदयाचे ठोके, स्लीप मॉनिटरिंगवरही नजर ठेवतो. Claim App - हे App देखील पॉप्युलर असून Google वर 1 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. या App मध्ये स्लीप, मेडिटेट, रिलॅक्ससारखे पर्याय मिळतात. ही App Play Store वर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. Calorie Counter App - या App ची खास बाब म्हणजे यात कॅलरी काउंट केलं जातं. कॅलरी काउंट करुन ते मेंटेन करता येतं. हे App पाच कोटीहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. या App ला रेटिंगही चांगलं आहे.
Fitbit App - फिटनेस सेक्टर हे App अतिशय व्हायरल होत आहे. फिटबिट App द्वारे स्लीप मॉनिटरिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, हार्ट रेट ट्रॅक करता येतं. यात जवळपास 240 वर्क आउट मोड्स मिळतात. हे App 90 दिवसांपर्यंत फ्री सर्विस देतं. त्यानंतर मात्र काही पैसे भरावे लागतात.
Step Counter - फिटनेससाठी पायी चालणं अतिशय फायदेशीर ठरतं. यासाठी स्टेप काउंटर अतिशय उपयोगी ठरू शकतं. या App मधील बिल्ट इन सेंटरद्वारे हे काम करतं. हे App 5 कोटीहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.