JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / मुंबईत Google आणि CEO सुंदर पिचाईंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण

मुंबईत Google आणि CEO सुंदर पिचाईंविरोधात गुन्हा दाखल, वाचा काय आहे प्रकरण

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार, कथित कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 जानेवारी : गुगलचे (Google) सीईओ सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) आणि कंपनीच्या इतर पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानुसार, कथित कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. Google ने याबाबत बोलताना सांगितलं, की त्यांनी कॉपीराइट मालकांसाठी यूट्यूब (YouTube) सारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या कंटेंटचं संरक्षण करण्यासाठी एक प्रणाली तयार केली आहे.

हे वाचा -  दलेर मेहंदी मेटावर्समध्ये परफॉर्म करणारा पहिला भारतीय गायक! काय आहे हे मेटावर्स?

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार उपनगरीय अंधेरी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते सुनिल दर्शन यांनी कॉपीराइट उल्लंघनाचं स्वरुप स्पष्ट केलं नसलं, तरी Google आणि इतर अधिकाऱ्यांवर कथित कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप करुन गुन्हा नोंदवण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती.

हे वाचा -  तिरंगा छापलेले शूज विक्री करणाऱ्या Amazon सेलरवर FIR दाखल, कारवाईचे आदेश

भारतात गुगल प्रवक्त्यांनी सांगितलं, की अनधिकृत अपलोडची तक्रार करण्यासाठी कॉपीराइट मालकांवर अवलंबून असतं. तसंच कॉपीराइट उल्लंघनाची सूचना मिळाल्यानंतर तो कंटेंट लगेच हटवला जातो आणि एकाहून अधिक वेळा उल्लंघन करणाऱ्यांचं अकाउंट बंद केलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या