JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / तुमच्या चिमुकल्यांचंही Facebook वर अकाऊंट आहे का? मग आधी हे वाचा

तुमच्या चिमुकल्यांचंही Facebook वर अकाऊंट आहे का? मग आधी हे वाचा

फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून 13 वर्षाखालील मुलांना दूर ठेवण्यासाठी एक असं AI (Artificial intelligence) डेव्हलप करत आहे, ज्याद्वारे युजर 13 वर्षाखालील आहे का हे समजण्यास मदत होईल.

जाहिरात

Have I Been Pwned? या वेबसाईटवर युजर्सला त्यांचा डेटा लीक झाला आहे की नाही हे समजेल. तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी लीक झाला आहे की नाही याची माहिती या वेबसाईटवर मिळेल.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : सोशल मीडियाचा (Social Media) वापर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण विविध सोशल मीडियाचा वापर करतात. लहान मुलांना सोशल मीडियावर अकाउंट तयार करण्यासाठी 13 वर्ष वय असणं आवश्यक आहे. परंतु आता अनेक लहान मुलं ही मर्यादा पाळत नसल्याचं समोर आलं आहे. 13 वर्षाखालील मुलांचंही सोशल मीडिया फेसबुकवर (Facebook) अकाउंट आहे. इतकंच नाही, तर लहान मुलं याच्या आहारी गेल्याचंही अनेकदा उघड झालं आहे. ही बाब चिंताजनक असून आता फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून 13 वर्षाखालील मुलांना दूर ठेवण्यासाठी एक असं AI (Artificial intelligence) डेव्हलप करत आहे, ज्याद्वारे युजर 13 वर्षाखालील आहे का हे समजण्यास मदत होईल. फेसबुक आणि इन्स्टाग्राम अशा प्रकारे डिझाईन करण्यात आलेलं नाही, ज्याचा वापर 13 वर्षाखालील मुलंही करू शकतील. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर विविध प्रकारचा कंटेंट असतो. त्यामुळे या सोशल मीडियाच्या वापरासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. परंतु आता कंपनी अशा गोष्टीवर सर्च करत आहे, ज्यात कमी वयोगटातील मुलांना या प्लॅटफॉर्मवर येण्यापासून रोखलं जाईल.

Facebook वरुन तुमचा डेटा लीक तर झाला नाही ना? या सोप्या Trick ने असं तपासा

13 वर्षाहून कमी वयोगटातील मुलांना शोधण्यासाठीच कंपनी AI डेव्हलप करत आहे. एखाद्या युजरकडून नवीन अकाउंट ओपन करतानाच AI त्या युजरच्या वयाचा अंदाज घेईल, जेणेकरुन 13 वर्षाखालील मुलांना ओळखणं शक्य होईल.

तुमच्या मुलांकडे स्मार्टफोन आणि Social Media अकाउंट आहे का? होऊ शकतो गंभीर परिणाम

अनेक कमी वय असलेले युजर्स चुकीची जन्मतारीख टाकून फेसबुक अकाउंट (Facebook Account) ओपन करतात. अशा युजर्सला शोधण्यासाठीही कंपनीने काही मार्ग काढले आहेत. तसंच या संवेदनशील प्रकरणांत फेसबुक OS प्रोव्हायडर, इंटरनेट ब्राउजर आणि इतर प्रोव्हायडरसह काम करत आहे, जेणेकरुन ते आपल्या डेटाद्वारे 13 वर्षाखालील मुलांची ओळख करण्यास मदत करू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या