नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी : फेसबुकचा (Facebook) वापर आपले फोटो, व्हिडीओ आपले विचार शेअर करण्यासाठी केला जातो. पण तुम्ही फेसबुकवरुन तुमचा बिजनेस वाढवण्यासाठी कर्जही (Facebook Loan) घेऊ शकता. फेसबुकवरुन तुम्ही विना गॅरंटी 50 लाख रुपयांपर्यंतच लोन घेऊ शकता. Facebook ने Small Business Loans Initiative सुरू केलं आहे. त्यासाठी Indifi सह पार्टनरशिप केली आहे. फेसबुकने आधी लोन सर्विस केवळ 200 शहरांत सुरू केली होती आणि आता ही सर्विस 329 शहरांपर्यंत वाढवली आहे. लोन घेण्यासाठी कोणतीही प्रोसेसिंग फीस घेतली जाणार नाही. लोन घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. किती मिळेल कर्ज - Facebook किंवा Meta स्वत: लोन देत नाही, तर Indifi कंपनी लोन देते. यात 2 लाख रुपयांपासून ते 50 लाख रुपयांपर्यंतचं लोन मिळू शकतं. लोन घेण्यासाठी काहीही गहाण ठेवण्याची गरज नाही. लोनवर 17 ते 20 टक्के वार्षिक व्याज द्यावं लागेल. महिला व्यावसायिकांना 0.2 टक्क्यांची सूट मिळेल. लोन अप्रुव्ह झालं, तर केवळ एका दिवसांत कन्फर्मेशन मिळतं. इतर डॉक्युमेंट्सचं काम 3 दिवसांत पूर्ण केलं जातं.
कोण घेऊ शकतं लोन - फेसबुकने या लोनसाठी दोन अटी ठेवल्या आहेत. या लोनसाठी अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचा बिजनेस त्याच्या सर्विस नेटवर्क असणाऱ्या भारतीय शहरात असावा. आणि दुसरी अट तुम्ही Meta किंवा Facebook शी संबंधित कोणत्याही App वर कमीत-कमी 6 महिन्यांपासून जोडलेले असावेत आणि तुमच्या बिजनेसची जाहिरात करत असावेत. या प्रोग्रामअंतर्गत केवळ लहान व्यावसायिकांना कर्ज मिळेल.
असं करा अप्लाय - फेसबुकवर कर्ज मिळवण्यासाठी ऑनलाइन अप्लाय करावं लागेल. त्यासाठी Facebook Small Business Loans Initiative पेजवर जावं लागेल. ज्यावेळी Apply Now वर क्लिक कराल, त्यावेळी एक फॉर्म ओपन होईल. यावर तुम्हाला तुमच्या बिजनेसशी संबंधित आणि काही इतर माहिती द्यावी लागेल. माहिती भरुन झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करावं लागेल. जर तुम्ही कर्ज देण्यासाठी पात्रतेचे असाल, तर कंपनी तुमच्याशी संपर्क करेल.