नवी दिल्ली, 12 जून : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) आपल्या मेसेंजरमध्ये (Messenger) 3 नवे फीचर्स सामिल केले आहेत. या फीचर्समध्ये QR कोडसह पेमेंट (Payment), क्विक रिप्लाय बार (Quick Replay Bar) आणि नव्या चॅट थीम्स सामिल आहेत. या नव्या फीचर्समुळे युजर्सला फेसबुक मेसेंजरवर अधिक सुविधा मिळतील. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या वार्षिक डेव्हलपर मीटिंगमध्ये फेसबुक व्हिडीओ कॉलमध्ये AR बेस्ड फिल्टर्स सामिल करणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. हे नवं फीचर फेसबुक आणि इन्स्टाग्राम दोन्हीमध्ये दिलं जाईल. QR कोड आणि पेमेंट लिंक - अमेरिकेत फेसबुक मेसेंजरद्वारे पेमेंट करण्याची सुविधा आधीच चालू करण्यात आली आहे. या फीचरचा वापर करुन युजर आपल्या मेसेंजरद्वारे QR कोड स्कॅन करुन दुसऱ्या व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकतो. यासाठी युजरला फेसबुक किंवा दुसरं कोणतंही अॅप डाउनलोड करण्याची गरज लागणार नाही. तसंच पेमेंट करताना कोणत्याही कॉन्टॅक्टला अॅड करावं लागणार नाही. याचा वापर करण्यासाठी युजरला मेसेंजर सेटिंगमध्ये फेसबुक पे द्वारे आपला QR कोड दुसऱ्या व्यक्तीला पाठवावा लागेल, जिथे पैसे पाठवायचे आहेत किंवा ज्याच्याकडून घ्यायचे आहेत.
क्विक रिप्लाय बार - मेसेंजरमध्ये या फीचरचा वापर करुन युजर आपल्या चॅटमध्ये पाठवण्यात आलेल्या फोटो किंवा व्हिडीओवर फास्ट रिप्लाय करू शकतात. यासाठी युजरला फोटो किंवा व्हिडीओवर टॅप करावं लागेल, जिथे क्विक रिप्लाय विंडो ओपन होईल.
नवी चॅट थीम - फेसबुकने मेसेंजर आणि इन्स्टाग्रामवर नवी चॅट थीम सामिल केली आहे. या थीम्सचा वापर करण्यासाठी युजर चॅट सेटिंगमध्ये आवडीच्या थीमवर क्लिक करू शकतात.