JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / FB पेपर लीकमधून मोठा खुलासा, Facebook वरुन कमी होतेय तरुणांची संख्या, वाचा काय आहेत कारणं

FB पेपर लीकमधून मोठा खुलासा, Facebook वरुन कमी होतेय तरुणांची संख्या, वाचा काय आहेत कारणं

फेसबुकच्या इंटर्नल कागदपत्रांमधून असंही समोर आलं, की सध्याच्या काळात फेसबुकवरुन 30 हून कमी वयोगटातील लोक कमी होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : Facebook बाबतच्या एका पेपर लीकमधून धक्कादायक खुलासे झाले आहेत. सध्याच्या काळात फेसबुकवरुन अनेकांचा कल कमी झाला असल्याचंही लीकमधून समोर आलं आहेत. वर्जच्या एका रिपोर्टमध्ये लीक्ड फेसबुक पेपरच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून आतापर्यंत अमेरिकेत तरुणांमध्ये Facebook App युजर्समध्ये 13 टक्क्यांची घसरण झाली आहे. रिपोर्टनुसार, यंग अडल्ट्स ज्यात 20 ते 30 वर्षांपर्यंतचे लोक असतात, त्यांच्यातही 4 टक्के युजर्सची फेसबुक वापरात घट झाली आहे. Facebook App च्या दररोजच्या अँगेजमेंटमध्येही मोठी घसरण होत आहे. ही बाब फेसबुकसाठी चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. फेसबुकच्या इंटर्नल कागदपत्रांमधून असंही समोर आलं, की सध्याच्या काळात फेसबुकवरुन 30 हून कमी वयोगटातील लोक कमी होत आहेत. याधीही फेसबुक 30 वर्षाहून कमी वयोगटातील युजर्सला आपल्या प्लॅटफॉर्मवर टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रगल करत आहे. फेसबुकने लहान मुलांसाठी मेसेंजर किड्सदेखील लाँच केलं होतं. त्यानंतर Tiktok वर अनेक युजर्स स्विच होत होते. ते पाहता फेसबुकनेही टिकटॉकसारखं रील्स फीचर लाँच केलं.

Facebook : भारतात फेसबुकचा झालाय ‘फेक’बुक; या संस्थेची धक्कादायक माहिती

रील्स सर्वात आधी Instagram साठी उपलब्ध होतं. परंतु नंतर ते फेसबुकसाठीही लाँच करण्यात आलं. कंपनी सतत 30 वर्षांहून कमी वयोगटातील लोकांना टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु इंटर्नल कागदपत्रांनुसार, अनेक तरुण फेसबुकवरुन जात असल्याचं चित्र आहे. वर्ज रिपोर्टनुसार, अनेक तरुणांना फेसबुकचा कंटेंट कंटाळवाणा, चुकीचा आणि नकारात्मक वाटत असल्याचं समोर आलं आहे.

Facebook वर तुमचं फेक अकाउंट आढळलं? असं करा डिलीट

फेसबुकची अशी स्थिती असली, तरी फेसबुकच्याच मालकीच्या असलेल्या Instagram सोबत असं होत नाही. इन्स्टाग्रामला लॉकडाउन काळात चांगला प्रतिसाद होता आणि आतादेखील इन्स्टाग्राम तरुणांमध्ये पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या