JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / YouTube वर छोटे व्हिडीओ बनवून करता येणार मोठी कमाई, कंपनीची घोषणा

YouTube वर छोटे व्हिडीओ बनवून करता येणार मोठी कमाई, कंपनीची घोषणा

हा ऑनलाईन व्हिडीओ प्लॅटफॉर्म येथे क्रिएटर्सला व्ह्यूअरशिप आणि अँगेजमेंटच्या आधारे व्हिडीओसाठी पैसे देईल. यूट्यूब हा फंड कोणत्याही व्हिडीओ मेकरसाठी ओपन करत आहे, जो साईट फॉलो करतो आणि ज्याला संपूर्ण गाइडलाइन्स माहित आहेत.

जाहिरात

यू-ट्यूबने एक पार्टनर प्रोग्राम ( Partner programme) सादर केला. जगभरातल्या 20 लाखांहून अधिक जणांना पैसे कमावण्यासाठी आम्ही मदत करतो, असा दावा यू-ट्यूबने केला आहे.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 मे: यूट्यूबने (youtube) शॉर्ट्स हा (youtube short) व्हिडीओ प्लॅटफॉर्म आणला असून कंपनीने कंटेंट क्रिएटर्ससाठी ही सुरुवात केली आहे, जेणेकरुन ते टिकटॉकला (tiktok) मात देऊ शकतील. हा ऑनलाईन व्हिडीओ प्लॅटफॉर्म येथे क्रिएटर्सला व्ह्यूअरशिप आणि अँगेजमेंटच्या आधारे व्हिडीओसाठी पैसे देईल. यूट्यूब हा फंड कोणत्याही व्हिडीओ मेकरसाठी ओपन करत आहे, जो साईट फॉलो करतो आणि ज्याला संपूर्ण गाइडलाइन्स माहित आहेत. संपूर्ण जगभरात शॉर्ट व्हिडीओ अ‍ॅप टिकटॉकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. अशात आता तरुणांमध्ये यूट्यूब शॉर्ट्स व्हिडीओ प्रसिद्ध होण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. यूट्यूब शॉर्ट्स प्लॅटफॉर्म अधिक सोयीस्कर करत आहे, जेणेकरुन लोक व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतील. तसंच कंपनीने यासाठी बऱ्याच टिकटॉक स्टार्सचीही भरती केली आहे. टिकटॉकच्या भरघोस, यशानंतर आता स्मार्टफोनवर व्हिडीओ बनवणं अधिक सोपं झालं आहे. यूट्यूब आपल्या क्रिएटर्सला यासाठी फंड देत आहे. यापूर्वी यूट्यूबकडून आपल्या क्रिएटर्सला अधिक पैसे दिले जात नव्हते, त्यानंतर अनेक युजर्स टिकटॉक, फेसबुक आणि इन्स्टाग्रामकडे वळले.

(वाचा -  Amazing! आता फोन चेक करणार तुमचं बॉडी टेंपरेचर, काय आहे या नव्या मोबाइलची किंमत? )

फेसबुकनेही टिकटॉकप्रमाणे आपला शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म सुरू केला असून व्हिडीओवर जाहिरातीही सुरू केल्या आहेत. 2020 मध्ये यूट्यूबने स्टार क्रिएटर्ससह शॉर्ट्स (youtube short) लाँच केलं होतं. अशात कंपनीने आता क्रिएटर्ससाठी जाहिरातींशिवायच पैसे कमावण्याचा मार्ग काढला आहे. मार्चपर्यंत शॉर्ट्सला 6.5 बिलियन डेली व्ह्यूज मिळू लागले होते. गेल्या आठवड्यापासून यूट्यूबने आपल्या साईटवर कोणालाही शॉर्ट्स अपलोड करण्याची परवानगी दिली आहे.

(वाचा -  अलर्ट! Review पाहून Online Shopping करताय; मग आधी हे वाचाच )

जर तुम्ही यूट्यूबचा वापर करत असाल, तर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये अनेक छोटे-छोटे व्हिडीओ दिसतील, जे युजर्सनी बनवून अपलोड केले आहेत. अशा व्हिडीओला लाखो व्ह्यूजदेखील आहेत. कंपनीने अ‍ॅपमध्ये एक शॉर्ट्स बटणही दिलं आहे, ज्यामुळे कोणीही सहजपणे व्हिडीओ बनवून अपलोड करू शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या