JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / आता छातीच्या X-Ray वरूनच समजणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? DRDO कडून AI टूल डेव्हलप

आता छातीच्या X-Ray वरूनच समजणार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? DRDO कडून AI टूल डेव्हलप

DRDO आणि CAIR कडून कोरोना संक्रमित रुग्णांबाबत माहिती घेण्यासाठी एक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) अल्गोरिदम डेव्हलप करण्यात आलं आहे. यात छातीच्या X-Ray द्वारे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 8 मे : कोरोनाचा विळखा वाढत असताना, त्यावर मात करण्यासाठी अनेक टेक्नोलॉजीचाही वापर होत आहे. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशन (DRDO) आणि सेंटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजेन्स अँड रोबोटिक्सकडून (CAIR) कोरोना संक्रमित रुग्णांबाबत माहिती घेण्यासाठी एक आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) अल्गोरिदम डेव्हलप करण्यात आलं आहे. यात छातीच्या X-Ray द्वारे व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकते. या टूलच्या डेव्हलपर्सनी दिलेल्या माहितीनुसार, या टूलचं नाव Atman AI ठेवण्यात आलं आहे, ज्याचा वापर छातीच्या X-Ray स्क्रिनिंगसाठी केला जातो. यात 96.73 टक्के अचूकता असल्याचं सांगण्यात आलं आहे. CAIR, DRDO चे डायरेक्टर डॉक्टर यू. के सिंह यांनी सांगितलं, की या डायग्नोस्टिक टूलला डेव्हलप करण्याचा उद्देश फ्रंट लाईन वर्कर्स आणि संशोधकांची मदत करणं हा आहे. ज्यामुळे लवकरात लवकर Covid-19 रुग्णांबाबत माहिती मिळू शकेल आणि त्यांच्यावर लवकर उपचारही होऊ शकतील. हे टूल काही सेकंदात रेडिओलॉजिकल फाइंडिंग्सला ऑटोमेटिकली डिटेक्ट करुन Covid-19 बाबत माहिती मिळण्यास फायदेशीर ठरेल.

(वाचा -  WhatsApp Privacy Policy:व्हॉट्सअ‍ॅपकडून मोठा दिलासा,अकाउंटबद्दल महत्त्वाची घोषणा )

टेस्ट करण्याचा खर्च कमी होईल - या टूलवर काम करणाऱ्या टीमने सांगितलं, की एक्स-रे चा वापर करुन कोरोनाबाबत अधिक प्रभावीपणे माहिती घेता येईल, तसंच यासाठीचा खर्चही कमी होईल. तसंच कोरोना रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या CT मशीन्सवरील भार कमी होऊन, त्या इतर रुग्णांसाठी वापरल्या जातील.

(वाचा -  तुमच्या भागात लस उपलब्ध आहे की नाही? केवळ 4 स्टेप्सद्वारे अशी मिळवा माहिती )

हे टूल डेव्हलप करण्यासाठी RT-PCR पॉझिटिव्ह रुग्णांच्या एक्स-रे चा वापर केला गेला आहे. संक्रमित रोगाच्या वेगवेगळ्या स्टेजेसवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या