नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : सध्या इंटरनेटच्या काळात Password चा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागतो. अशात जर तुम्ही एखादा कॉमन पासवर्ड ठेवत असाल, तर तो लगेच हॅक होण्याचा धोका असतो. Mozilla Foundation च्या एका रिपोर्टनुसार, ज्यावेळी कधीही पासवर्ड तयार कराल, त्यावेळी तो कधीही एखाद्या सुपरहिरो नावाप्रमाणे असू नये. या रिपोर्टमध्ये अशाप्रकारचे पासवर्ड न बनवण्याबाबत सांगण्यात आलं आहे. अनेक जण अतिशय सोपे पासवर्ड तयार करतात, ज्यामुळे हॅकर्स युजर्सच्या डेटापर्यंत सहज पोहोचू शकतात. Haveibeenpwned.com च्या आकडेवारीनुसार केलेल्या अभ्यासावरुन असं लक्षात आलं, की सुपरहिरो नावाचे पासवर्ड सर्वाधिक हॅक केले जातात. त्याशिवाय कोणतंही पहिलं नाव, जन्मतारीख किंवा 12345 सारखं कॉम्बिनेशन आणि azerty सारखे शब्द पासवर्ड म्हणून सर्वाधिक वापरले जातात. हे हॅकर्समध्ये पॉप्युलर पासवर्ड आहेत.
हे पासवर्ड सर्वाधिक हॅक होतात - –Superman –Batman –Spider-Man –Wolverine –Iron Man –Wonder Woman –Daredevil –Thor –Black Widow –Black Panther त्याशिवाय James Howlett/Logan, Clark Kent, Bruce Wayne आणि Peter Parker पासवर्ड लवकर हॅक होतात. कोणताही पासवर्ड जितका कठीण, तितका तो हॅक करणंही कठीण होतं. संख्या, अक्षरं, चिन्ह असलेले पासवर्ड ठेवणं सुरक्षित ठरतं. असे पासवर्ड एकत्र करुन ते हॅक करणं कठीण ठरतं.
NordPass च्या एका वार्षिक रिपोर्टमध्ये 2020 मध्ये सर्वाधिक वापरल्या गेलेल्या पासवर्डचा खुलासा करण्यात आला होता. 2020 मध्ये 123456 हा सर्वात सोपा पासवर्ड होता. हा सेम पासवर्ड तब्बल 2.3 कोटी लोकांनी वापरला होता. 123456 या सर्वात सोप्या पासवर्डनंतर 123456789 हा दुसरा सर्वात सोपा आणि सर्वाधित लोकांनी वापरलेला पासवर्ड होता. picture1 हा तिसरा सोपा पासवर्ड ठरला. NordPass ने या आठवड्याच्या सुरुवातीला आपला रिपोर्ट जारी केला होता. ज्यात 200 कॉमन पासवर्ड्सबाबत खुलासा करण्यात आला होता. या रिपोर्टनुसार, काही पासवर्ड्स क्रॅक होण्यास 3 वर्षांपर्यंतचा वेळ लागतो. तर काही सोपे पासवर्ड अगदी एका सेकंदाहूनही कमी वेळेत क्रॅक केले जातात. त्यामुळे आपलं सोशल मीडिया अकाउंट, बँक अकाउंट किंवा इतर कोणतंही अकाउंट हॅक न होण्यासाठी त्याचा पासवर्ड अतिशय स्ट्राँग ठेवणं गरजेचं आहे.