JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / एक हजारापेक्षा ही कमी किमतीत मिळवा स्मार्टवॉच, कसं आणि कुठे मिळेल ही Deal? वाचा

एक हजारापेक्षा ही कमी किमतीत मिळवा स्मार्टवॉच, कसं आणि कुठे मिळेल ही Deal? वाचा

या सेलमध्ये तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टवॉच खरेदी करता येईल. जाणून घ्या सविस्तर

जाहिरात

Online Sale

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 15 ऑक्टोबर : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दिवाळीची खरेदी करायला कोणाला आवडत नाही? या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफरही दिल्या जातात. अशा ऑफर देण्यात ई-कॉमर्स कंपन्या तर आघाडीवर असतात. यंदा दिवाळीची खरेदी करताना नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण सध्या ई-कॉर्मस कंपनी अ‍ॅमेझॉनचा ‘अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल एक्स्ट्रा हॅपिनेस डेज्’ सेल सुरू असून त्यात स्मार्टवॉच खरेदीवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल एक्स्ट्रा हॅपिनेस डेज् सेलमध्ये स्वस्तात स्मार्टवॉच खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या सेलमध्ये तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टवॉच खरेदी करता येईल. तसंच बँक ऑफर्सचाही फायदा घेता येईल, ज्यामुळे स्मार्टवॉचची किंमत आणखी कमी होईल. चला तर, तुम्हाला कोणत्या स्मार्टवॉचच्या खरेदीवर किती सूट मिळू शकते, ते जाणून घेऊ. Zebronics ZEB-FIT280CH: या स्मार्टवॉचची मूळ किंमत 3,999 रुपये आहे. पण हे स्मार्टवॉच तुम्हाला अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल एक्स्ट्रा हॅपिनेस डेज् सेलमध्ये 999 रुपयांना मिळेल. म्हणजेच या स्मार्टवॉचच्या खरेदीवर तुम्हाला 75 टक्के डिस्काउंट मिळेल. याशिवाय, तुम्ही आयसीआयसीआय बँक किंवा अ‍ॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला आणखी 10 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. हे ही वाचा ;आयफोन 11 मिळतोय फक्त 15 हजार रुपयांत, फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुफान डिस्काउंट, जाणून घ्या ऑफरबद्दल या स्मार्टवॉचचा डिस्प्ले 1.39 इंचाचा आहे. याशिवाय 12 स्पोर्ट्स मोड, आयपी 68 रेटिंग, एसपी O2 रेटिंग आणि 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग, अशी विविध वैशिष्ट्यं आहेत. TAGG Verve NEO: या स्मार्टवॉचची मूळ किंमत 3,999 रुपये आहे, परंतु या स्मार्टवॉचवर सेलमध्ये तुम्हाला 70 टक्के डिस्काउंट मिळत असून, ते तुम्हाला 1,199 रुपयांना खरेदी करता येईल. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो. या स्मार्टवॉचमध्ये 1.69 इंचाचा एचडी डिस्प्ले देण्यात आलाय. तसंच 60 प्लस स्पोर्ट्स मोड, 10 दिवसांची बॅटरी लाइफ, 150 प्लस्ट वॉच फेस, वॉटरप्रुफ, 24/7 हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन ट्रॅकिंग अशी वैशिष्ट्य यामध्ये आहेत. Infinix ने लाँच केला जबरदस्त स्मार्टफोन, कमी पैशात खास स्पेसिफिकेशन्स Gionee STYLFIT GSW5 Pro: या स्मार्टवॉच खरेदीवर 78 टक्के डिस्काउंट मिळत असून ते सेलमध्ये 999 रुपयांना मिळेल. या स्मार्टवॉचची मूळ किंमत 4,499 रुपये आहे. खरेदी करताना आयसीआयसी बँक आणि अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतं. या स्मार्टवॉचचा 1.69 इंचाचा फुल टच डिस्प्ले आहे. एसपी O2 आणि 24/7 हार्ट रेट मॉनिटरिंग, 100 प्लस वॉच फेस, आयपी 68 रेटिंग आणि स्पोर्ट्स आणि स्लिप ट्रॅकिंग या स्मार्टवॉचची वैशिष्ट्यं आहेत. स्मार्टवॉच खरेदी करण्याचा तुमचा विचार असेल, आणि जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील, तर आजच सेलचा फायदा घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या