JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / ट्विटरवर ‘ब्लू टिक’साठी पैसे द्यावे लागल्यास वापरकर्त्यांसाठी Koo ठरेल का नवं 'घरटं'? काय सांगतात तज्ज्ञ?

ट्विटरवर ‘ब्लू टिक’साठी पैसे द्यावे लागल्यास वापरकर्त्यांसाठी Koo ठरेल का नवं 'घरटं'? काय सांगतात तज्ज्ञ?

एलॉन मस्क यांचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, ‘कू’ या भारतीय कंपनीनं आपल्या युजर्सना ‘ग्रीन टीक’ देण्यासाठी एक सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 03 नोव्हेंबर : एलॉन मस्क यांचे ट्विट व्हायरल झाल्यानंतर, ‘कू’ या भारतीय कंपनीनं आपल्या युजर्सना ‘ग्रीन टीक’ देण्यासाठी एक सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे. ‘कू’ ही भारतीय मायक्रोब्लॉगिंग साईट असून, भारतात ती ट्विटरची प्रतिस्पर्धी मानली जाते. ‘कू’चे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी न्यूज18 ला सांगितलं, " युजर्सचा अस्सल आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कूनं सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू केली आहे." “कू वर प्रख्यात व्यक्तींना ‘यलो टिक’ दिली जाते. जेणेकरून युजर्स त्यांना सहज शोधू शकतील. ही सर्व प्रक्रिया कोणतंही शुल्क न आकारता केली जाते,” असं मयंक बिदावतका यांनी नमूद केलं. याबाबत त्यांनी ट्विटही केलं आहे. “आपलं हँडल व्हेरिफाय करण्यासाठी @kooindia मध्ये तुमचं स्वागत आहे. ‘फ्री’ आणि तत्त्काळ अकाउंट व्हेरिफिकेशन टिक मिळवण्यासाठी कमेंटमध्ये मला पिंग करा! दरमहा 650 रुपये भरू नका,” असं हे ट्विट आहे. WhatsApp Ban: व्हॉट्सअ‍ॅपकडून 26 लाखांहून अधिक अकाऊंटवर बंदी; तुम्ही ही चूक करत नाही ना? अशा परिस्थितीमध्ये भारतीय युजर्स ट्विटरऐवजी ‘कू’ला जास्त पसंती देतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इंडस्ट्रीतील अंदाज काय सांगतात दरम्यान, एक कंटेंट मॅनेजमेंट प्रोफेशनल, लेखक आणि राजकीय विश्लेषक असलेल्या मिथुन विजय कुमार यांनी न्यूज18 ला सांगितलं की, “अनसिस्टिमॅटिक आणि अचानक निर्णय घेणं हे मस्क यांचं वैशिष्ट्यं आहे. त्यांचं सबस्क्रिप्शन मॉडेल जगभरातील ट्विट युजर्सवर परिणाम करणारं ठरेल, याची मस्कना कल्पना असेलच. सबस्क्रिप्शन मॉडेल आणि व्यवस्थापनातील बड्या अधिकार्‍यांची हकालपट्टी याबरोबरच त्यांनी इतरही काही आश्चर्यकारक निर्णय घेतले आहेत. एलॉन मस्क यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ट्विटरनं आपल्या इंजिनीअर्सना दररोज 12 तास काम करण्याचे आदेश दिले आहेत.” कुमार म्हणाले की, प्लॅटफॉर्मवरील बॅजचे फायदे आणि प्राधान्य स्वरूप पाहता, युजर्सचा ड्रॉप-ऑफ दर जास्त राहणार नाही. आपला मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणाले, “जर 5 दशलक्षाहून अधिक भारतीय युजर्स केवळ मनोरंजनासाठी आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पेड सबस्क्रिप्शन निवडू शकतात, तर ट्विटरसाठी पैसे मोजण्यात ते नक्कीच माघार घेणार नाहीत. म्हणूनच ट्विटरची ड्रॉप-ऑफ टक्केवारी खूप कमी असण्याची शक्यता आहे.” Elixir.Aiच्या संस्थापक आणि सीईओ मयुराक्षी दास यांच्या मते, ‘पे फॉर ब्लू टिक’ मॉडेलमुळे युजर्स अधिक चांगल्याप्रकारे व्हेरिफाइड होतील आणि प्लॅटफॉर्मवरील बोगस अकाउंट्स कमी होतील. “मोठा आउटरीच असलेलं ट्विटर थोडं अधिक जबाबदार व्यासपीठ बनेल. जे युजर्स गंभीर आणि विचारपूर्वक मतं मांडतात तेच तिथे टिकून राहतील. बाकीचे लोक तिथून नाहीसे होतील,” असं दास म्हणाल्या. “देशातील आर्थिक परिस्थितीनुसार शुल्क आकारण्याचा निर्णय घेऊन एलॉन मस्क यांनी विचारीपणाचं दर्शन घडवलं आहे,” असंही दास म्हणाल्या. दिवाळीनंतर ‘या’ आयफोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद Surmount Business Advisors Pvt ltd चे संस्थापक नीरज बोरा म्हणाले, “अकाउंट व्हेरिफिकेनची आत्तापर्यंतची जी संकल्पना आहे ती सध्या अकाउंट असलेल्या व्यक्तीबाबतच आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीला विशेष असा दर्जा मिळतो. लिंक्डइनमध्ये ज्या प्रमाणे प्रीमियम अकाउंटसाठी पैसे भरावे लागतात तसंच ट्विटवर अकाउंट व्हेरिफिकेशन किंवा ब्लू टिकसाठी पैसे भरावे लागतील. पण लिंक्डइनमध्ये कुणीही प्रीमिअम मेंबरशीप घेऊ शकतं. तसं ट्विटरवर नाही. ब्लू टिक विशेष दर्जा कुणाला द्यायचा याचा निर्णय त्याचा साईटवरील परफॉरमन्स पाहून कंपनी घेते. हाच यातील मुख्य फरक आहे.” “ट्विटरला अगोदर हे स्पष्ट करावं लागेल की, टिकमुळे व्हेरिफिकेशन साध्य होतं की प्रीमियम दर्जा मिळतो. कारण कदाचित कंपनी किंवा ब्रँडसाठी ही एकच बाब असेल. परंतु, एखाद्या युजरसाठी ती वेगळी असू शकते,” असंही नीरज बोरा म्हणाले. सायबर सुरक्षा दरम्यान, ProcessIT ग्लोबलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजर्षी भट्टाचार्य यांनी या प्रकराची एक वेगळी बाजू अधोरेखित केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ट्विटरवरील ब्लू टिक पेड करून व्हेरिफिकेशन प्रोसेसशी जोडल्यामुळे निश्चितच सायबर हल्ला आणि फिशिंग ई-मेल्सचं प्रमाण वाढेल. भारतामध्ये स्मार्टफोन युजर्सची संख्या झपाट्यानं वाढत आहे. हे युजर्स आपल्या डिव्हाइसवर वारंवार मेसेजिंग अॅप्स वापरतात. त्यामुळे सायबर हल्ले आणि फिशिंगचे प्रकार भारतात जास्त दिसून येतील.” “फिशिंग ई-मेल पाठवण्याव्यतिरिक्त, सायबर गुन्हेगार या अॅप्सवर बनावट वेबसाइट्सच्या अनसेफ लिंक्स पाठवतील. हे सर्व भयावह ठरू शकतं. त्यामुळे युजर्सनी नुकसान टाळण्यासाठी कोणत्याही लिंक उघडण्यापूर्वी सावध राहिलं पाहिजे,” असं आवाहन राजर्षी भट्टाचार्य यांनी केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या