मुंबई, 25 मार्च : कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा धोका भारतातही वाढला आहे त्यामुळे संपूर्ण देशात lockdown ची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आता पुढचे 21 दिवस लोकांना घरातून बाहेर पडता येणार नाही. या काळात घरीच राहणाऱ्या लोकांसाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी आहे. VIDEO बघताना आता तुमचा कमी डेटा खर्च होईल पण त्याबदल्यात तुम्हाला सुपर HD क्वालिटी कंटेटला मुकावं लागणार आहे. 14 एप्रिलपर्यंत सर्व HD चॅनेल्स SD मध्ये दिसतील. यामुळे एचडी streaming साठी खर्च होणारा डेटा वाचेल. Lockdown मुळे देशात internet चा वापर वाढला आहे. याचा परिणाम डेटा स्पीडवर झाला आहे. यांनातर कंपन्यांनी हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी यासाठी पावले उचलत एक बैठक घेतली होती. यात सोनी, गूगल, फेसबुकच्या प्रतिनधींनी सहभाग घेतला होता. यावेळी डिजिटल इंडस्ट्रीशी संबंधित कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 14 एप्रिलपर्यंत एचडी आणि अल्ट्रा एचडी Streaming एसडी मध्ये दिसणार आहे. तसंच एसडी कंटेंट 480p रेसोल्युशनपेक्षा जास्त क्वालिटीत दिसणार नाही. वाचा- महत्त्वाची घोषणा, रेल्वे मंत्रालयानेही वाढवला लॉकडाउन, 14 एप्रिलपर्यंत बंद! YouTube ने सुद्धा भारतात व्हिडीओ streaming ची क्वालिटी कमी केली आहे. यामुळे युजर्सचा डेटा कमी खर्च होईल. गुगलने म्हटलं की, 31 मार्चपर्यंत युट्युबचे सर्व विडिओ एसडी फॉरमॅटमध्ये दिसतील. सध्याच्या कठीण काळात कंपनी प्रत्येक देशात सरकार आणि नेटवर्क कंपन्यासोबत यावर काम करत आहे. इंटरनेटवर येणारा लोड कमी करण्याच्या दृष्टीने गुगलने हा उपाय केला आहे. याआधी युरोपात ही सिस्टीम सुरू केली आहे. चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत 15 हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. कोरोना बधितांची संख्याही झपाटयाने वाढत असल्याने जगातील अनेक देशांनी lockdown ची घोषणा केली आहे. चीननंतर इटली, इराण या देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे. अन्य बातम्या #21दिवस : शहरं लॉकडाउन; गावांचं काय? ‘इथे परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा जावई शिंकला, सासरच्या मंडळींनी थेट घराबाहेर खांबाला बांधला! धक्कादायक VIDEO