मराठी बातम्या /
टेक्नोलाॅजी /
Smartphone Guidelines: सावधान! स्मार्टफोन युजर्ससाठी केंद्र सरकारची नवी गाईडलाईन, ‘या’ गोष्टी न करण्याचा सल्ला
Smartphone Guidelines: सावधान! स्मार्टफोन युजर्ससाठी केंद्र सरकारची नवी गाईडलाईन, ‘या’ गोष्टी न करण्याचा सल्ला
Smartphone Guidelines: सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांकडे पाहता इंटरनेट वापरकर्त्यांनी जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन वापरकर्ते ऑनलाइन असताना सुरक्षेसाठी फॉलो करू शकतील अशा ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ वर भारत सरकारनं एक एडव्हायजरी जारी केली आहे.
मुंबई, 18 सप्टेंबर: सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांकडे पाहता इंटरनेट वापरकर्त्यांनी जागरूक असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत स्मार्टफोन वापरकर्ते ऑनलाइन असताना सुरक्षेसाठी फॉलो करू शकतील अशा ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ वर भारत सरकारनं एक एडव्हायजरी जारी केली आहे. काय करावं, काय करू नये? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दलानं (CERT-In) नागरिकांनी त्यांच्या स्मार्टफोनवर अॅप डाउनलोड करताना किंवा ऑनलाइन ब्राउझिंग करताना काय करावं आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शक तत्त्विं जारी केली आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हानिकारक अॅप्स डाउनलोड होण्याचा धोका कमी करण्यासाठी केवळ Google Play Store आणि App Store सारख्या अधिकृत अॅप स्टोअरमधील कोणतेही अॅप वापरा.
अॅप डाउनलोड करण्यापूर्वी नेहमी अॅपचे वर्णन, डाउनलोडची संख्या, वापरकर्ता टिप्पण्या आणि अतिरिक्त माहिती तपासा.
अॅप परवानग्या वेरिफाय करा आणि अॅपशी संबंधित असलेल्या परवानग्यांनाच अनुमती द्या.
साइड लोडेड अॅप्स इन्स्टॉल करण्यासाठी अविश्वसनीय स्त्रोतावर क्लिक करू नका.
Android डिव्हाइस विक्रेत्यांकडून उपलब्ध असताना Android अपडेट आणि पॅच इन्स्टॉल करा.
अविश्वसनीय वेबसाइट ब्राउझ करू नका किंवा अविश्वासू लिंक्सवर क्लिक करू नका आणि कोणत्याही संशयास्पद ईमेल आणि एसएमएसमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करताना सावधगिरी बाळगा.
मूळ फोन नंबरसारखे नसलेल्या संशयास्पद नंबरकडे लक्ष द्या. स्कॅमर अनेकदा त्यांचा खरा फोन नंबर लपवण्यासाठी ईमेल-टू-टेक्स्ट सेवा वापरून त्यांची ओळख लपवतात.
संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी माहिती घ्या. अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या एखाद्याला फोन नंबरद्वारे शोधण्याची आणि नंबर वैध आहे की नाही याबद्दल माहिती शोधण्याची अनुमति देतात.
वेबसाइट डोमेन स्पष्टपणे दाखवणाऱ्या URL वर क्लिक करा. जेव्हा शंका असेल तेव्हा वापरकर्ते शोध इंजिन वापरून थेट तपासू शकतात की त्यांनी भेट दिलेल्या वेबसाइट कायदेशीर आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.