मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /पुन्हा पुन्हा Mobile recharge ची कटकटच नाही; एकदाच फक्त 225 रु. देऊन मिळवा Lifetime validity

पुन्हा पुन्हा Mobile recharge ची कटकटच नाही; एकदाच फक्त 225 रु. देऊन मिळवा Lifetime validity

 दिवसेंदिवस स्मार्टफोन (Smartphone) युजर्सची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने कॉलिंग (Calling) आणि इंटरनेट (Internet) या दोन्ही गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो.

दिवसेंदिवस स्मार्टफोन (Smartphone) युजर्सची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने कॉलिंग (Calling) आणि इंटरनेट (Internet) या दोन्ही गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो.

दिवसेंदिवस स्मार्टफोन (Smartphone) युजर्सची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने कॉलिंग (Calling) आणि इंटरनेट (Internet) या दोन्ही गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: दिवसेंदिवस स्मार्टफोन (Smartphone) युजर्सची संख्या वाढत आहे. प्रामुख्याने कॉलिंग (Calling) आणि इंटरनेट (Internet) या दोन्ही गोष्टींसाठी स्मार्टफोनचा वापर केला जातो. विविध टेलिकॉम कंपन्या (Telecom Companies) युजर्ससाठी विविध प्रकारचे डाटा (Data) आणि कॉलिंग प्लॅन सातत्याने लॉंच करत असतात. एका विशिष्ट कालावधीनंतर प्लॅन संपल्यावर युजर्सना रिचार्ज करणं गरजेचं असतं. वारंवार रिचार्ज (Recharge) करावं लागत असल्यानं काही युजर्स या प्रकाराला कंटाळतात आणि लाईफटाइम व्हॅलिडिटीचा (Lifetime Validity) प्लॅन शोधू लागतात.

    सध्या मार्केटमध्ये एका कंपनीकडून अशा प्रकारचा प्लॅन उपलब्ध करून दिला जातो. या रिचार्जसाठी तुम्हाला फार पैसेखील खर्च करावे लागत नाहीत. एमटीएनएलचा (MTNL) एक प्लॅन असा आहे, ज्यामुळे तुम्हाला लाईफटाइम व्हॅलिडिटी मिळू शकते. वारंवार रिचार्जचा खर्च टाळायचा असेल तर तुम्हाला या खास प्लॅनची वैशिष्ट्यं माहिती असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे या प्लॅनविषयी माहिती समजल्यानंतर तुम्हाला कदाचित आश्चर्याचा धक्कादेखील बसू शकतो. `झी न्यूज हिदीं`ने या विषयीची माहिती दिली आहे.

    हेही वाचा - फोनमध्ये 5G Network साइन दिसतंय, पण 5G सपोर्ट मिळेल का? असं करा चेक

    जर ऐन कामाच्यावेळी तुमच्या स्मार्टफोनची व्हॅलिडीटी संपली तर तुमच्यासमोर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या प्लॅनची व्हॅलिडीटी संपली आहे, त्यामुळे रिचार्ज करणं गरजेचं आहे, हेदेखील अनेक लोकांना माहिती नसतं. यामुळे अडचणींमध्ये भर पडू शकते. अशावेळी लोक वारंवार रिचार्ज करायला लागू नये यासाठी लाईफटाइम व्हॅलिडीटी असलेला प्लॅन शोधू लागतात. सध्या मार्केटमध्ये सर्वांत स्वस्त लाईफटाइम व्हॅलिडीटी असलेला प्लॅन उपलब्ध आहे.

    एमटीएनएल ही टेलिकॉम कंपनी हा प्लॅन उपलब्ध करून देत आहे. या प्लॅनची किंमत 225 रुपये आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्सना 100 मिनिटांचं कॉलिंग मिळतं. तसंच या प्लॅनमध्ये व्हॉईस कॉलिंगसाठी प्रतिसेकंद 0.02 पैसे असा दर आहे. हा दर तसा किफायतशीर म्हणायला हवा. या प्लॅनचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे या प्लॅनअंतर्गत युजर्सना लाईफटाइम व्हॅलिडीटी मिळते. त्यामुळे युजर्सना वारंवार रिचार्ज करण्याची गरज पडत नाही. तसंच प्लॅन संपलाय म्हणून सिमकार्ड (Sim Card) बंद होईल का, असा प्रश्न सतावत नाही. जर तुम्हाला हा प्लॅन आवडला असेल तर तुम्ही तो लगेचच अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. एकूणच उपलब्ध असलेल्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत एमटीएनएलचा हा लाईफटाइम व्हॅलिडीटीचा प्लॅन ग्राहकांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणारा आहे. हा प्लॅन सुरू केल्यास ऐन कामाच्या वेळी फोनमुळे निर्माण होणाऱ्या समस्या टळतील.

    First published:
    top videos

      Tags: Mobile Phone, Recharge, Technology