नवी दिल्ली, 22 जानेवारी : प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) पुढील आठवड्यात ( Republic Day) आहे. या दिनाचं औचित्य साधून विविध ई- कॉमर्स कंपन्यांनी (e-commerce companies) ग्राहकांसाठी विशेष ऑफर सुरू केल्या आहेत. अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी ‘रिपब्लिक डे सेल’ (Republic Day Sale) सुरू केला आहे. अॅमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) यांसारख्या ई-कॉमर्स वेबसाइट्स सर्व कॅटेगरीमध्ये ‘रिपब्लिक डे सेल’ ऑफरसह बंपर कॅशबॅक आणि सूट देत आहेत. इतर अनेक कंपन्यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या सेलसाठी कॅशबॅक ऑफर्स सुरू केल्या आहेत. हे कॅशबॅक मिळवण्यासाठी काही कॅशबॅक अॅप्स आहेत. या अॅप्सवर तुम्हाला अकाउंट तयार करावं लागेल. या अॅप्सचा वापर करून कोणत्याही ई-कॉमर्स वेबसाइटवर खरेदी केल्यास चांगला फायदा होईल. मिळालेला कॅशबॅक ‘कॅशकरो’ (CashKaro) अॅपवर ट्रॅक करता येईल. हे अॅप्स ग्राहकांना खरेदीसाठी कॅशबॅकच्या स्वरूपात मिळालेल्या मार्केटिंग शुल्काचा एक भाग देतात.
‘कॅशकरो’ची (CashKaro) ऑफर - ‘कॅशकरो’ने Amazon, Flipkart, Big Bazar, Jabong आणि Myntra यांसह 500 हून अधिक व्यापाऱ्यांसोबत भागीदारी केली आहे. तेथे तुम्हाला 5 टक्के ते 10 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक किंवा रिवॉर्ड्स मिळण्याची चांगली ऑफर मिळेल. CouponDunia ने Flipkart, Amazon, MakeMyTrip, Paytm, BookMyShow यांसारख्या 2000 हून अधिक ऑनलाइन ब्रँड्ससोबत भागीदारी केली आहे. येथे तुम्हाला खरेदीवर 2 टक्के ते 12 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कॅशबॅक मिळवण्याची संधी मिळेल. तुमच्याकडे कॅशबॅक मिळालेली रक्कम ही 250 रुपये किंवा त्याहून अधिक झाल्यास ती तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करता येईल. GoPaisa ने प्रोमो कोड, कूपन आणि कॅशबॅक ऑफर देण्यासाठी Amazon, Flipkart, Jabong, LensKart, MakeMyTrip, Tata CliQ, Yatra यांसारख्या 1000 हून अधिक ऑनलाइन ब्रँडसह भागीदारी केली आहे. येथे खरेदी करताना तुम्हाला अतिरिक्त 2 टक्के ते 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळते. कॅशबॅक/रिवॉर्ड मिळवण्याची संधीही मिळते.
Lafalafa मोबाइल अॅप हे एक कुपन आणि कॅशबॅक अॅग्रिगेटर आहे. याचा वापर केल्यास, तुम्हाला कंपनीची भागीदारी असलेल्या व्यापाऱ्यांकडून खरेदी केल्यावर 50 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळेल. . Zingoy अॅप Amazon, Flipkart, Myntra, Ajio, Croma, Pharmeasy यांसारख्या 1000 पेक्षा जास्त नोंदणीकृत व्यापार्यांकडून करण्यात येणारी दैनंदिन खरेदी व विशेष विक्रीवर कॅशबॅक ऑफर करते.