नवी दिल्ली, 22 जुलै: टेलिकॉम कंपन्यांनी जेव्हापासून अनलिमिटेड कॉलची सुविधा दिली आहे, तेव्हापासून कॉलिंगचा वापर अधिक वाढला आहे. अनेक स्मार्टफोन युजर्सकडे ट्रू कॉलर (Truecaller) असतं. परंतु अधिकतर लोकांना याच्या फीचर्सबाबत माहिती नसते. या अॅपद्वारे कॉल येण्याआधीच स्क्रिनवर कोण कॉल करतंय याची माहिती मिळते. Truecaller ने नुकतेच काही नवे फीचर्स लाँच केले आहेत. Truecaller द्वारे काही ट्रिकचा वापर फायदेशीर ठरू शकतो. ट्रू कॉलरद्वारे Unknown नंबरवरुन कोणाचा कॉल येतोय याची माहिती मिळू शकते. कॉलसोबतच समोर त्या व्यक्तीचं नावही येतं. या फीचरमुळे कंपन्यांचे नको असलेले कॉल, फ्रॉड कॉल याची युजरला आधीच माहिती मिळते.
Truecaller डाउनलोड केल्यानंतर स्क्रिनवर एक मेसेज येतो. तो मेसेज Allow करावा लागतो. त्यानंतर जे कोणतेही कॉल येतील, त्याआधी काही सेकंद स्क्रिनवर कोण कॉल करत आहे, याबाबतचं नोटिफिकेशन येतं.
या फीचरमुळे वेळीच आपल्याला एखाद्या कॉलचा अलर्ट मिळतो. परंतु महत्त्वाची बाब म्हणजे, हा अलर्ट अशाच युजर्सला मिळतो, ज्यांच्या फोनमध्ये मोबाईल डेटा किंवा वायफाय कनेक्ट आहे.
ही डिफॉल्ट सुविधा आहे. Truecaller इन्स्टॉल केल्यानंतर, सर्व Allow केल्यानंतर युजर्सला काही सेकंदआधी नोटिफिकेशनमध्ये कॉलबाबत माहिती मिळते.