नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन कंपन्यांपैकी एक असलेल्या Apple चे अनेक प्रोडक्ट्स आणि फीचर्स असे आहेत ज्यामुळे लोकांचा जीव वाचला आहे. आतापर्यंत iPhone मधील अलर्टमुळे लोकांचा जीव वाचल्याच्या, त्यांना मदत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. Apple ने मागील वर्षी एक नवं प्रोडक्ट एयरटॅग (AirTag) लाँच केलं होतं. यामुळे अनेक चोरीच्या घडल्या. पणा आता या AirTag मुळे एका तरुणीचा जीव वाचला असल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. Apple ने AirTag मुळे होणाऱ्या चोरीच्या घटना कमी करण्यासाठी फाइंड माय नेटवर्कसह (Find My Network) खास ब्लूटूथ आयडेंटिफायर्सचा वापर केला आहे. हे आयडेंटिफायर्स लवकर बदलतात. यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ट्रॅक केलं जाऊ शकत नाही. या सेफ्टी फीचरमुळे (Safety Feature) अमेरिकेत एका तरुणीचा जीव वाचला असून एका स्टॉकरला (Stalker) अटक करण्यात आली आहे.
स्टॉकर अटकेत - एका रिपोर्टनुसार, पोलिसांनी एक व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीवर AirTag द्वारे तरुणीला स्टॉक केल्याचा आरोप होता. मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणीला आपल्या iPhone वर एक अलर्ट मिळाला होता. त्या अलर्टमध्ये एक AirTag तिच्यासोबत ट्रॅव्हल करत असल्याचं समजलं. हा अलर्ट मिळाल्यानंतरच त्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली.
या Apple AirTag सेफ्टी फीचरमुळेच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं. Apple ने अनेक नवे फीचर्स लाँच केले आहेत, ज्यामुळे एयरटॅग्सचा वापर करणं अधिक सोपं झालं आहे. यामुळे स्टॉकिंगसारख्या प्रकरणातही कमी आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.