त्यामुळे अशा ऑनलाईन फ्रॉडपासून वाचण्यासाठी युजर्सनी सतर्क राहणं गरजेचं आहे. कोणत्याही लिंकवर क्लिक करुन आपले पर्सनल डिटेल्स देऊ नका. तसंच ईमेलवर आलेल्या अनोळखी मेलवरही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
नवी दिल्ली, 15 एप्रिल : जर तुम्ही सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिडेट अर्थात BSNL चं मोबाईल कनेक्शन वापरत असाल, तर सावध व्हा. BSNL ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीने युजर्सला याबाबत अलर्ट केलं आहे. टेक साईट keralatalecom नुसार, संपूर्ण देशात BSNL ग्राहकांना आपलं KYC Update करण्यासाठी एसएमएस (SMS) पाठवले जात आहेत. मिळालेल्या रिपोर्टनुसार, BSNL ग्राहकांना केवायसी अपडेटसाठी मेसेज येत असून, त्या मेसेजमध्ये ग्राहकांना 24 तासांत आपलं KYC अपडेट करा, अन्यथा नंबर ब्लॉक होईल, असा मेसेज पाठवला जात आहे. परंतु ग्राहकांनी एक बाब लक्षात ठेवावी, बीएसएनएलकडून असे मेसेज कधीही पाठवले जात नाहीत. ग्राहकांना CP-SMSFST, AD-VIRINF, CP-BLMKND, BP-ITLINN अशा कोड्सवरुन SMS येत आहेत. ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजमध्ये एक फोन नंबरही दिला जात आहे. 24 तासाच्या आत या नंबरवर कॉल करुन KYC अपडेट करा, असं मेसेजमधून सांगितलं जात आहे.
काय आहे सत्य? या फेक एसएमएसची (Fake SMS) दखल घेतली आहे. BSNL ने सांगितलं की, टेलिकॉम कंपनी ग्राहकांना कधीही KYC साठी मेसेज करत नाही. हा SMS फेक असून, यावर ग्राहकांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये. फेक मेसेजद्वारे सायबर क्रिमिनल्स ग्राहकांची खासगी माहिती एकत्र करत असल्याचं, जाणकाराचं म्हणणं आहे. बँक खात्यातून पैसे चोरी करण्यासाठी या माहितीचा वापर केला जाऊ शकतो.
कोणत्याही व्यक्तीशी आपली पर्सनल माहिती आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, बँक डिटेल्स, ओटीपी किंवा इतर कोणतीही माहिती शेअर न करण्याचा सल्ला सायबर एक्सपर्ट्सकडून देण्यात आला आहे.