JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / सावधान! WhatsApp तुम्हाला आजारी पाडतोय; या समस्यांना बळी पडतायेत लोक

सावधान! WhatsApp तुम्हाला आजारी पाडतोय; या समस्यांना बळी पडतायेत लोक

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) सारख्या Apps ने लोकांना सतत-दिवसभर ऑनलाइन (Online) राहण्याची सवय लागली आहे. ही सवय धोकादायकही ठरू शकते.

जाहिरात

कनेक्ट करण्यासाठी अकाउंट सिलेक्ट करा आणि Done वर क्लिक करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आणि टेलिग्राम (Telegram) सारख्या Apps ने लोकांना सतत-दिवसभर ऑनलाइन (Online) राहण्याची सवय लागली आहे. ही सवय धोकादायकही ठरू शकते. अशात जे लोक 24 तास, सतत ऑनलाइन असतात, ते इतरांनीही 24 तास ऑनलाइन राहावं अशी अपेक्षा करतात. त्यामुळे समोरच्याकडून मेसेजचा लगेच रिप्लाय (Message Reply) न मिळाल्यास लोक अस्वस्थ होतात. कोरोना महामारीमुळे (Corona Pandemic) यात अधिकच वाढ झाली आहे. जाणकारांच्या मते, लोकांमध्ये लगेच उत्तर मिळवण्याची सवय वाढली आहे. मेसेजचा लगेच रिप्लाय न आल्यास चिडचिड होणं, चिंता करणं किंवा सतत ऑनलाइन राहणं हे त्याचे साइड इफेक्ट होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हे वाचा -  WhatsApp वर एका सावधगिरीने टळला 90 हजारांचा Fraud,तुम्हीही या गोष्टी लक्षात ठेवा

24 तास ऑनलाइन राहणारे दुसरा व्यक्तीही ऑनलाइन असेल असंच समजतात आणि तरीही त्याने आपला मेसेज पाहिला नाही अशी भावना निर्माण होते. प्रोफेसर जेफ हॅनकॉक यांनी सांगितलं, की स्मार्टफोनद्वारे (Smartphone) आपण एकमेकांशी भावनात्मक रुपात जोडले आहोत.

हे वाचा -  Airtel ग्राहकांना झटका, पुन्हा वाढणार Tariff Plan

दुसऱ्या देशात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला मेसेज पाठवला आणि उत्तर मिळालं नाही, तर समोरचा व्यक्ती काही वेगळंच स्वत:च्या मनाचं कारणं समजू शकतो. पार्टनरकडूनही लगेच रिप्लाय आला नाही, तर प्रेम कमी झाल्याची भावनाही अनेकांमध्ये निर्माण होते. यामुळे रिलेशनशिपमध्ये (Relationship) कटुता वाढू शकते.

हे वाचा -  WhatsAppकडून 20लाखांहून अधिक भारतीय युजर्सचे अकाउंट बॅन,तुम्हीही अशी चूक करू नका

लगेच उत्तर मिळण्याच्या अपेक्षेत वाढ - स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे सोशल मीडिया लॅबचे डायरेक्टर प्रोफेसर जेफ हॅनकॉक यांनी सांगितलं, की अनेक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये सोशल मीडियाचे सर्व प्लॅटफॉर्म्स, मेसेजिंग अॅप्स आहेत. ते लगेच मेसेजचा रिप्लाय देण्यास सक्षम आहेत. फोनमध्ये Apps ची वाढती संख्या लगेच रिप्लाय मिळवण्याची अपेक्षा वाढवत आहेत. दरम्यान, IT नियम 2021 अंतर्गत WhatsApp ने आपला सातवा कम्प्लायेंस रिपोर्ट सादर केला. नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने डिसेंबर महिन्यात 20 लाखांहून अधिक WhatsApp Account बॅन केले. छळवणूक तसंच अपमानास्पद कंटेंट (Harassment/Abusive Content) आणि हॅक्ड अकाउंटबाबत (Hacked Account) खराब कंटेंट मिळाला होता. तसंच अकाउंट्सद्वारे फेक डेटा (Fake Data) लोकांपर्यंत पोहोचवला जात होता. त्यामुळे अनेकांना फ्रॉड, फसवणुकीच्या (Fraud) समस्यांचा सामना करावा लागला. त्यानंतर ही अकाउंट बॅन करण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या