क्लिनिंग App - फोनची मेमरी वाढवण्यासाठी युजर्स अनेकदा क्लिनिंग Apps चा वापर करतात. या Apps ऐवजी गुगल फाईल्स App (Files by Google) चा वापर करा. हे क्लिनिंग App चंही काम करतं. हेदेखील स्टोरेज क्षमता चांगली करण्यासाठी मदत करतात.
नवी दिल्ली, 12 मे : भारतीय टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel) नुकतेच दोन नवे प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Prepaid Recharge Plan) लाँच केले आहेत. या रिचार्ज प्लॅनवर ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि हाय स्पीड 4G इंटरनेटशिवाय हेल्थ इन्शोरन्सचा (Life Insurance) लाभही दिला जात आहे. 279 रुपयांत 4 लाखांचा इन्शोरन्स - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी 279 रुपयांचा रिचार्ज प्लॅन अॅक्टिव्ह केला, तर त्यांना या प्लॅनमध्ये दिवसाला 1.5GB हाय स्पीड 4G डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनेलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS पाठवण्याच्या सुविधेसह 4 लाख रुपयांचा लाईफ इन्शोरन्ससही मिळेल. या लाईफ इन्शोरन्ससाठी कोणत्याही मेडिकल टेस्ट किंवा पेपरवर्कची गरज भासणार नाही. तसंच या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह एअरटेल Xstream Premium चं सब्सक्रिप्शनही फ्री देण्यात येत आहे. डेली लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होईल.
179 रुपयांत 2 लाखांचा लाईफ इन्शोरन्स - एअरटेलच्या 179 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 2 लाख रुपयांचा लाईफ इन्शोरन्स ऑफर केला जात आहे. या रिचार्ज प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे.
यात दररोज 2GB हाय स्पीड 4G इंटरनेट, कोणत्याही नेटवर्कवर अनेलिमिटेड कॉलिंगसह दररोज 300 SMS ची सुविधा दिली जात आहे. तसंच एअरटेल Xstream Premium चं फ्री सब्सक्रिप्शनही आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होईल.