नवी दिल्ली, 1 डिसेंबर : टेलिकॉम कंपन्या Airtel आणि Vodafone-Idea ने एका मागोमाग एक आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी वाढ केली. आज या कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन जवळपास 25 टक्क्यांनी वाढले आहेत. Airtel ने 12 प्रीपेड रिचार्ज प्लॅन महाग केले. या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत 20 रुपयांपासून 501 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. भारतात Airtel चे 35 कोटी, तर Vodafone-Idea चे 27 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. कंपन्यांनी हे दर का वाढवले यामागे Average Revenue हे कारण आहे.
एयरटेल आणि वोडाफोन-आयडिया दोन्ही कंपन्या कर्जात आहेत. मार्च 2021 पर्यंत एयरटेलवर 93.40 हजार कोटी रुपयांचं कर्ज होतं. तर वोडाफोन-आयडियावर 1.90 लाख कोटी रुपये कर्ज होतं. या कर्जात अॅडजस्टेड ग्रॉस रेवेन्यूशिवाय इतरही कर्ज सामिल आहेत. सुप्रीम कोर्टानेही या टेलिकॉम कंपन्यांना कर्ज फेडण्यासाठी 10 वर्षांचा कालावधी वाढवून दिला आहे. एयरटेलने ऑक्टोबरमध्ये राइट्स इश्यूद्वारे 21 हजार कोटी रुपये जमा केले, तर वोडाफोन-आयडियाला अद्याप इन्व्हेस्टर मिळाले नाहीत.
टेलिकॉम कंपन्या Average Revenue Per User वाढवत आहे. यामुळे कर्ज फेडण्यासाठी काहीशी मदत मिळण्याची आशा आहे. प्रति ग्राहक कमाईमध्ये Airtel 155 रुपयांसह सर्वात पुढे आहे. त्याचं लक्ष्य जानेवारीपर्यंत 180 रुपये करण्याचं आहे. नव्या प्लॅनमुळे एयरटेलची प्रति ग्राहक कमाई 165 रुपये होईल. म्हणजेच 35 कोटी ग्राहकांकडून 10-10 रुपये अधिक मिळतील. यामुळे त्यांच्या रेवेन्यूमध्ये वाढ होईल. Vodafone-Idea ची प्रति ग्राहक कमाई 109 रुपये आहे. त्यांनादेखील प्रत्येक युजरकडून 10-10 रुपये अधिक मिळतील. दरम्यान, Airtel ने टॅरिफ वाढवण्याची घोषणा केल्याच्या एक दिवसानंतर Vodafone-Idea नेही टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली.