JOIN US
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / PhonePe युजर्सला झटका! आता वॉलेटमधून Online Transaction करणं महागणार

PhonePe युजर्सला झटका! आता वॉलेटमधून Online Transaction करणं महागणार

अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरुन (Credit Card) फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून लहान-मोठे ट्रान्झेक्शन्स करतात. पण आता फोनपे युजर्सला PhonePe चा वापर करणं महाग पडणार आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : PhonePe Wallet चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ग्रॉसरी स्टोर्समधून सामान मागवण्यासाठी, पाणी-विज बील भरण्यासाठी, मोबाइल, डीटीएच रिचार्ज करण्यासाठी, ऑनलाईन ऑर्डर अशा अनेक कामांसाठी फोनपे वॉलेटचा वापर केला जातो. अनेक युजर्स क्रेडिट कार्डवरुन (Credit Card) फोनपे वॉलेटमध्ये पैसे टाकून लहान-मोठे ट्रान्झेक्शन्स करतात. पण आता फोनपे युजर्सला PhonePe चा वापर करणं महाग पडणार आहे. 2 टक्क्यांहून अधिक एक्स्ट्रा चार्ज - PhonePe App वर दिलेल्या माहितीनुसार, आता एखाद्या युजरने फोनपे वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डने 100 रुपये जमा केल्यास, त्याला 2.06 टक्के (GST सह) एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागेल. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डद्वारे 200 रुपये अ‍ॅड केल्यास त्याला 4.13 टक्के एक्स्ट्रा चार्ज लागेल. 300 रुपये अ‍ॅड केल्यास, 6.19 टक्के एक्स्ट्रा चार्ज लागेल.

GPay वर केवळ 2 मिनिटांत काढा Online FD, पाहा सोपी प्रोसेस

हा नियम नुकताच लागू झाला आहे. UPI आणि डेबिट कार्डद्वारे फोनपे वॉलेटमध्ये पैसे अ‍ॅड केल्यास कोणताही चार्ज लागत नाही.

मोबाइल SIM Card बाबतच्या या नियमांत सरकारकडून बदल, तुम्हाला असा होणार फायदा

PhonePe वर खरेदी करता येणार सर्व इन्शोरन्स कंपन्यांचे प्रोडक्ट्स - नुकतंच फोनपेने त्यांना लाइफ इन्शोरन्स आणि जनरल इन्शोरन्स प्रोडक्ट विकण्यासाठी IRDA अर्थात Insurance Regulatory and Development Authority कडून तत्वत: मान्यता मिळाली असल्याची माहिती दिली आहे. कंपनीने सांगितलं, की ते आता आपल्या 30 कोटीहून अधिक युजर्सला इन्शोरन्ससंबंधी सल्ला देऊ शकतील.

GPay चा UPI PIN बदलायचा आहे? ही आहे सोपी पद्धत

IRDA ने फोनपेला इन्शोरन्स ब्रोकिंग लायसन्स (Insurance Broking license) दिलं आहे. आता फोनपे भारतात सर्व इन्शोरन्स कंपन्यांच्या इन्शोरन्स प्रोडक्टची विक्री करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या