women icc world cup 2023
मुंबई 04 ऑक्टोंबर : पुरुष टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षी (2023) फेब्रुवारी महिन्यात आयसीसी वुमन्स टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं यजमानपद दक्षिण आफ्रिककडे देण्यात आलं आहे. नुकतंच आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय वुमन्स टीमची पहिली मॅच पारंपरिक प्रतिस्पर्धा असलेल्या पाकिस्तानशी 12 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. पुढच्या वर्षी होणारी वुमन्स T20 वर्ल्ड-कप स्पर्धा म्हणजे या स्पर्धेची ही आठवी आवृत्ती असून, 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीमध्ये मॅचेस होणार आहेत. या व्यतिरिक्त गरज पडल्यास फायनलसाठी 27 फेब्रुवारी हा एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. वुमन्स T20 वर्ल्ड कपसाठी 10 टीम्स निश्चित झाल्या आहेत. या 10 टीम्स ‘ग्रुप 1’ आणि ‘ग्रुप 2’ अशा दोन गटांमध्ये विभागण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि बांगलादेश या टीम्स ग्रुप 1मध्ये आहेत. इंग्लंड, भारत, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड या टीम्स ग्रुप 2मध्ये आहेत. असं आहे वुमन्स T20 वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक - 10 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, केपटाउन 11 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, पार्ली 11 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, पार्ली 12 फेब्रुवारी - भारत विरुद्ध पाकिस्तान, केपटाउन 12 फेब्रुवारी - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, केपटाउन 13 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, पार्ली 13 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, पार्ली 14 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, गेबरहा 15 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध भारत, केपटाउन 15 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड, केपटाउन 16 फेब्रुवारी - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गेबरहा 17 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश, केपटाउन 17 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, केपटाउन 18 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध भारत, गेबरहा 18 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया 19 फेब्रुवारी - पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, पार्ली 19 फेब्रुवारी - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, पार्ली 20 फेब्रुवारी - आयर्लंड विरुद्ध भारत 21 फेब्रुवारी - इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान, केपटाउन 21 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, केपटाउन 23 फेब्रुवारी - सेमी-फायनल 1, केपटाउन 24 फेब्रुवारी - रिझर्व्ह डे, केपटाउन 24 फेब्रुवारी - सेमी-फायनल 2, केपटाउन 25 फेब्रुवारी रिझर्व्ह डे, केपटाउन 26 फेब्रुवारी फायनल, केपटाउन टीम इंडिया आतापर्यंत केवळ एकदाच वुमन्स टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहचली आहे. 2020 साली फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 85 रन्सनी पराभव केला होता. या वेळी जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला T20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी आहे.