नवी दिल्ली, 28 डिसेंबर : जगातली सर्वात मोठी लीग म्हणून आयपीएलकडे पाहिले जाते. रोमांचक आणि पैसा यामुळं आयपीएलमध्ये सामिल होण्यासाठी सर्व खेळाडू उत्सुक असतात. क्रिकेटच्या या फॉरमॅटची प्रसिद्धी पाहता विस्डननेही दशकातला आयपीएल संघ जाहीर केला आहे. यामध्ये आतापर्यंत आयपीएल गावजणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. मात्र यात कर्णधारपद धोनी किंवा विराटकडे नाही तर दुसऱ्या खेळाडूकडे आहे. विस्डननं जाहीर केलेल्या संघामध्ये आयपीएलमध्ये सर्वात जास्त विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयपीएमध्ये सर्वात जास्त धावा करणारा सरेश रैनाचाही या संघात समावेश आहे. मात्र या संघाचे नेतृत्व हे रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघानं चारवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. 2019मध्ये चेन्नी आणि मुंबई यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यातही मुंबईनं बाजी मारली होती. वाचा- बॅटला न लागताच मैदानातून गायब झाला चेंडू, LIVE सामन्यात सुरू झाली शोधाशोध विस्डनच्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांची निवड करण्यात आली आहे. तर, मधल्या फळीत सुरेश रैना, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स यांना घेतले आहे. तर फिनिशर म्हणून अर्थातच महेंद्र सिंग धोनीला संघात घेतले आहे. गोलंदाजीमध्ये सुनील नरेन, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि ड्वेन ब्राव्हो या खेळाडूंचा समावेश आहे. वाचा- क्रिकेटपटूंनी हॉटेलमध्ये महिलेसोबत केले अश्लिल वर्तन, संघातून हकालपट्टी **असा आहे विस्डनचा आयपीएल संघ-**रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुरेश रैना, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, रवींद्र जडेजा, सुनील नरेन, लसिथ मलिंगा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि ड्वेन ब्राव्हो. वाचा- धोनीच्या नेतृत्वाखाली CSKकडून खेळणाऱ्या गोलंदाजानं जाहीर केली निवृत्ती