कोलकाता, 6 मे : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांनी आज रात्री (6 मे) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासाठी भोजनाचं आयोजन केलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चांना प्रारंभ झाला आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) गांगुलीला आपल्या पक्षात घेण्यासाठी आधीपासूनच प्रयत्नात असल्याच्या चर्चा आहेत. गेल्या वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधीही या चर्चांनी जोर धरला होता. त्या निवडणुकीत भाजप जिंकल्यास गांगुलीला पश्चिम बंगालचं (West Bengal CM) मुख्यमंत्रिपद देऊ करण्यात आलं होतं, अशीही चर्चा होती; मात्र, सौरव गांगुलीने अद्याप कोणतीही राजकीय इच्छा प्रदर्शित केलेली नाही. अमित शाह यांच्या शुक्रवारच्या अत्यंत बिझी दौऱ्यामध्ये गांगुलीच्या घरी जाण्याचा बेत नाही. व्हिक्टोरिया मेमोरियल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. तेथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केलेल्या मुक्ती मात्रिका या कार्यक्रमात सौरव गांगुली यांची पत्नी आणि प्रसिद्ध नृत्यांगना डोना गांगुली नृत्य सादर करणार आहे. त्यानंतर अमित शाह सौरव गांगुली यांच्या बेहाला इथल्या निवासस्थानी जाणार आहेत. तिथे सौरव यांनी त्यांच्यासाठी Dinner आयोजित केलं असण्याची शक्यता आहे.
मुंबई-गुजरातच्या सामन्यात रणवीर सिंगच्या लूकची चर्चा! हिटमॅनच्या सिक्सवर अशी दिली Reaction की..
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी अमित शाह यांच्यासोबत पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि खासदार स्वपन दासगुप्ता असतील. अमित शाह आणि सौरव गांगुली यांच्या या संभाव्य भेटीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मिष्टी डोई ही खास बंगाली मिठाई अमित शाह यांना आवर्जून खाऊ घालावी, असं मी सौरव गांगुली यांना सांगेन,’ असं त्या म्हणाल्या. दरम्यान, भाजपचे उपाध्यक्ष दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी मात्र या बैठकीबद्दल वेगळंच मत व्यक्त केलं. ‘अमित शाह सौरव गांगुली यांच्या घरी जाणार आहेत की नाहीत, याबद्दल मला काहीच माहिती नाही. आमच्याकडे असलेल्या वेळापत्रकात तरी या भेटीचा समावेश नाही. वेगवेगळी मतं विचारात घेण्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणं ही आमच्या पक्षाची परंपरा आहे,’ असं घोष म्हणाले. कगिसो रबाडाला आवडली नाही धवनची मस्करी, धू धू धूतलं, Video Viral केंद्रातलं भाजप सरकार आणि राज्यातलं तृणमूल काँग्रेस सरकार या दोन्हींशीही सौरव गांगुलीचे चांगले संबंध आहेत. काही दिवसांपूर्वीच गांगुली यांनी नबण्णा या पश्चिम बंगालच्या सेक्रेटरिअॅटमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे आता अमित शाहंसोबत त्याची भेट होणार का आणि त्यांची भेट झालीच तर नेमक्या कोणत्या गोष्टींची चर्चा होणार, गांगुली भाजपमध्ये येणार का, अशा अनेक प्रकारच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटलं आहे.