पुणे, 7 मे : आयपीएलच्या 53व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना शनिवारी (7 एप्रिल) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात सुपर जायंट्सचे खेळाडू आईच्या नावाची जर्सी घालणार आहेत. या नवीन आयपीएल फ्रँचायझीने चालू हंगामातील कामगिरीने खूप प्रभावित केले आहे. मातृदिन दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. सुपर जायंट्सने मदर्स डेच्या एक दिवस आधी तो साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊ सुपर जायंट्सने शनिवारी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये खेळाडूंच्या जर्सीच्या मागे त्यांच्या आईचे नाव लिहिले आहे. फ्रेंचाइजीने या व्हिडिओचे कॅप्शन लिहिले, ‘आई हे तुझ्यासाठी आहे. अशा प्रकारे तुम्ही मदर्स डे साठी तयारी करता – सुपर जायंट्स पद्धतीने! या जर्सीच्या मागील बाजूस केशरी रंगात खेळाडूंच्या आईचे नाव लिहिलेले आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा स्थितीत सामना जिंकून त्यांना आपलं स्थान मजबूत करायचे आहे. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहणे हे करो या मरो आहे. कारण आता एका पराभवाने केकेआरचे समीकरण बिघडू शकते**.** राजस्थान रॉयल्स टीमची मोठी चूक! सामन्याच्या मधेच अंपायरने खेळाडूला काढलं बाहेर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएलच्या 15 व्या मोसमात आतापर्यंत 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 7 जिंकले आहेत आणि 3 हरले आहेत. 14 गुणांसह लखनौचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफसाठी पात्र होण्यापासून तो फक्त दोन पावले दूर आहे. लखनौच्या संघाने आजच्या सामन्यात विजयाची नोंद केली, तर अंतिम चारमध्ये पोहोचण्याचा त्यांचा मार्ग सुकर होईल. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील केकेआरच्या संघाने या मोसमात 10 सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी 4 जिंकले आहेत आणि 6 गमावले आहेत. केकेआर आठ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे.