JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / 5 IPL जिंकणाऱ्या रोहितलाच दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या IPL संघातून वगळलं! 'या' युवा खेळाडूला दिली जागा

5 IPL जिंकणाऱ्या रोहितलाच दिग्गज क्रिकेटपटूनं आपल्या IPL संघातून वगळलं! 'या' युवा खेळाडूला दिली जागा

आयपीएलच्या तेराव्या हंगामात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करत सेहवागनं आपली बेस्ट आयपीएल प्लेइंग इलेव्हन निवडली.

जाहिरात

रोहितच्या निर्णयाबद्दल बोलताना आपली चूक झाल्याची जाहीर कबुली सुनील गावस्कर यांनी दिली. त्यावर स्वतःलाच शिक्षा देत असल्याचं सांगत षटकातील उर्वरित चेंडूंवर काहीही बोलणार नाही असं म्हटलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर : आयपीएलच्या तेराव्या हंगामात (IPL 2020) मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) पाचवं विजेतेपद जिंकत आपल्या नावावर एका इतिहासाची नोंद केली. रोहितच्या शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघानं श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) एकहाती विजय मिळवला. मात्र या विजयानंतरही भारताचा दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवागनं (Virender Sehwag) आपल्या IPL XI संघात रोहित शर्माला जागा दिली नाही आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची निवड करत सेहवागनं आपली बेस्ट आयपीएल प्लेइंग इलेव्हन निवडली. सेहवागनं निवडलेल्या आपल्या संघात स्टार पावर खेळाडूंचा समावेश आहे. सेहवागनं सलामीवीर म्हणून किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल आणि RCBचा युवा खेळाडू देवदत्त पडक्कीलची निवड केली आहे. देवदत्तला यंदाच्या आयपीएलमध्ये ‘एमर्जिंग प्लेअर ऑफ आयपीएल 2020’ पुरस्कार मिळाला होता. त्यानं आयपीएलच्या 15 सामन्यात 31.53च्या सरासरीनं 124.80 च्या स्ट्राइक रेटनं 473 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. वाचा- IPL 2020 : या मोसमातले 5 वाद; जी मैदानाबाहेरही गाजली आणि झाली मुबलक चर्चा सेहवागनं आपल्या संघात नंबर 3 वर मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर, नंबर 4 वर विराट कोहली आहे. या संघात रोहित शर्माकडे कर्णधारपद दिले नाही आहेत. तर विराट कोहलीकडे नेतृत्व दिले आहे. पाचव्या क्रमांकावर सेहवागनं डेव्हिड वॉर्नरची निवड केली आहे. तर, एबी डिव्हिलिअर्सची सहाव्या क्रमांकावर आहे. वाचा- IPL 2020 मध्ये भारताला मिळाले 6 दर्जेदाज युवा खेळाडू सेहवागनं गोलंदाजीमध्ये कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या जलद गोलंदाजांची निवड केली आहे. तर युजवेंद्र चहल, राशिद खान या फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. तर 12वा खेळाडू म्हणून इशान किशनची निवड केली आहे. वाचा- IPL 2021 च्या लिलावाच्या वेळी या 5 खेळाडूंबाबत होऊ शकतात मोठे निर्णय सेहवागची आयपीएल XI: केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एबी डिव्हिलिअर्स, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, राशिद खान, इशान किशन (12वा खेळाडू ).

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या