JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / या 9 वर्षाच्या मुलीचा विराटने उचलला खर्च, कोण आहे ही मुलगी?

या 9 वर्षाच्या मुलीचा विराटने उचलला खर्च, कोण आहे ही मुलगी?

पूजा बिश्नोई (Pooja Bishnoi) नावाच्या 9 वर्षांच्या मुलीने ट्विटरवर आपला इयत्ता 5वीचा रिझल्ट शेअर केला. तिला 76.17 टक्के मार्क्स मिळाले आहेत. मुख्य म्हणजे या ट्विटमध्ये तिने विराट कोहलीचाही (King Kohli) उल्लेख केला आहे.

जाहिरात

फोटो सौजन्य: @poojabishnoi36

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 26 मार्च : भारतीय क्रिकेटपटू जसं मैदानावर शतकांचे रेकॉर्ड्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करतात, तसंच ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातही चांगली सामाजिक कामं करून सर्वांची मनं जिंकताना दिसतात. भारतीय संघातल्या अनेक क्रिकेटपटूंनी समाजात चांगल्या कामांसाठी हातभार लावल्याचं दिसून आलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) त्याला अपवाद नाही. माजी कर्णधार विराट कोहलीने अनेक सामन्यांमध्ये रेकॉर्ड्स करून नाव कमावलं आहे. तसंच तो समाजसेवेसाठीही तत्पर असल्याचं वेळोवेळी दिसून येतं. अशीच त्याच्या एका चांगल्या कामाची बातमी नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे कोहलीच्या फॅन्सना त्याचे फॅन असल्याबद्दल अजून अभिमान वाटेल. तसंच विराटबद्दलचा आदरही दुणावेल. ‘क्रिकेट एन् मोअर डॉट कॉम’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. पूजा बिश्नोई (Pooja Bishnoi) नावाच्या 9 वर्षांच्या मुलीने ट्विटरवर आपला इयत्ता 5वीचा रिझल्ट शेअर केला. तिला 76.17 टक्के मार्क्स मिळाले आहेत. मुख्य म्हणजे या ट्विटमध्ये तिने विराट कोहलीचाही (King Kohli) उल्लेख केला आहे. पूजाने आपल्या रिपोर्टकार्डचा स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये तिने विराट कोहलीला टॅग केलं आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिलं आहे, की ‘आज माझा 5वीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. मला 76.17 टक्के मार्क्स मिळाले आहेत. विराट कोहली सरांचे मी आभार मानते, की त्यांनी मला देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. थँक्यू.’

हे वाचा - Good News! Women’s IPL चा मार्ग मोकळा, BCCI नं घेतला ऐतिहासिक निर्णय

कोण आहे पूजा बिश्नोई? एक उत्तम अ‍ॅथलीट (Athlete) होण्याचं स्वप्न पूजा बिश्नोईने बाळगलं आहे. ते पूर्ण करण्यासाठी विराट कोहली तिला मदत करत आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षीच पूजाने आपल्या अ‍ॅथलीट बनण्याच्या स्वप्नासाठी पावलं उचलली होती. पूजाने वयाच्या 8 व्या वर्षी 3 किलोमीटर्सचं रनिंग 12.50 मिनिटांत पूर्ण करून 10 वर्षांखालच्या जागतिक विक्रमाची नोंद केली होती. याशिवाय पूजाने वयाच्या 6व्या वर्षी 10 किलोमीटर्सचं रनिंग फक्त 48 मिनिटांमध्ये पूर्ण केली होती. तसंच पूजाला दुबई सरकारकडून आर्यन पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.

हे वाचा -  IPL 2022 : या 5 कारणांमुळे CSK चा कर्णधार झाला ‘सर’ रवींद्र जडेजा!

पूजा बिश्नोई जोधपूरमधल्या गुडा बिश्नोईयान या एका छोट्या गावातली आहे. विराट कोहली फाउंडेशनतर्फे (Virat Kohli Foundation) पूजाचं ट्रेनिंग, प्रवास आणि न्यूट्रिशनचा खर्च केला जात आहे. एवढंच नाही, तर या फाउंडेशनकडून पूजाला राजस्थानात जोधपूरमध्ये एक फ्लॅटही घेऊन देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

अशा प्रकारे विराट कोहलीसारखे क्रिकेटपटू आपल्या मैदानावरच्या खेळीने आणि सामाजिक कार्यातल्या योगदानाने चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यामुळे पूजासारख्या छोट्या गावातल्या प्रतिभावान मुलींना खऱ्या अर्थाने त्यांचं स्वप्न पूर्ण करता येऊ शकेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या