आयपीएल 2022 साठी (IPL 2022) एमएस धोनीने (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सची (CSK) कॅप्टन्सी सोडली आहे. धोनीने आता कर्णधारपदाची जबाबदारी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) दिली आहे. टीम इंडियाच्या या स्टार ऑलराऊंडरला सीएसकेने आयपीएल लिलावाआधी 16 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. तर एमएस धोनीला 12 कोटी रुपये मिळाले होते. धोनीने रवींद्र जडेलाच त्याचा उत्तराधिकारी का निवडलं, यावर एक नजर टाकूयात. (Photo- AFP)
बॅटिंग : रवींद्र जडेजा आक्रमक आणि मोठी खेळी करण्यासाठी ओळखला जातो. रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या नावावर दोन ट्रिपल सेंच्युरी आहेत. याशिवाय तो वनडे आणि टी-20 मध्ये परिस्थितीनुसार बॅटिंग करतो. टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 125 तर आयपीएलमध्ये 128 चा आहे. (Photo- PTI)
बॉलिंग : डावखुरा स्पिन बॉलर असलेला जडेजा खूप कमी वेळेमध्ये आपली ओव्हर पूर्ण करतो. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 242, वनडेमध्ये 188 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 विकेट आहेत. तर 200 आयपीएल सामन्यांमध्ये त्याने 127 विकेट घेतल्या आहेत. भारतीय खेळपट्टींवर जडेजा जास्त धोकादायक ठरतो. (Photo- PTI)
फिल्डिंग : रवींद्र जडेजा हा भारताचा सर्वोत्तम फिल्डर आहे. कोणत्याही ठिकाणी फिल्डिंग करण्यासाठी जडेजा उपलब्ध असतो. टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 100 पेक्षा जास्त कॅच आहेत. जडेजाने 276 टी-20 सामन्यांमध्ये 107 कॅच घेतले आहेत. (Photo- PTI)
चेन्नई सुपर किंग्समध्ये आतापर्यंत एमएस धोनी आणि सुरेश रैना या दोघांनीच कॅप्टन्सी केली आहे. टीममध्ये मोईन अली आणि ड्वॅन ब्राव्हो हे वरिष्ठ खेळाडूही आहेत, पण फ्रॅन्चायजीने भारतीय खेळाडूवरच विश्वास दाखवला. जडेजा सध्या 33 वर्षांचा आहे. मोईन अली आणि ब्राव्हो यांच्यापेक्षा त्याचं वय कमी आहे, त्यामुळे आणखी काही वर्ष तो सीएसकेचा कर्णधार राहू शकतो. (Photo- PTI)
याशिवाय भारतीय खेळाडू असल्यामुळे जडेजा संपूर्ण मोसम उपलब्ध असेल. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही प्रकारांमध्ये जडेजा उत्कृष्ट असल्यामुळे टीमचं संतुलनही तयार होतं, ज्याचा फायदा टीमला होतो. जडेजाने आयपीएलमधून आतापर्यंत 93 कोटी रुपये कमावले आहेत. याशिवाय जाहिरात आणि बीसीसीआयसोबतच्या करारामुळेही त्याला कोट्यवधी रुपये मिळतात. (Photo- PTI)