JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Pak: विजय देवरकोंडानेही लावली स्टेडियममध्ये हजेरी, कुर्ता-पायजामामध्ये पाहून चाहते म्हणाले...

Ind vs Pak: विजय देवरकोंडानेही लावली स्टेडियममध्ये हजेरी, कुर्ता-पायजामामध्ये पाहून चाहते म्हणाले...

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दक्षिण भारताचा सुपरस्टार विजय देवरकोंडा दुबईला पोहोचला आहे. सामन्यापूर्वी दक्षिण भारतीय सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाइगर’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 28 ऑगस्ट: आशिया चषक 2022 ला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना दुबईत खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी राजकारणापासून बॉलिवूडपर्यंतचे स्टार्स पोहोचले आहेत. अशातच भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी दक्षिण भारताचा सुपरस्टार विजय देवरकोंडा दुबईला पोहोचला आहे. त्यामुळे त्याला पाहून चाहत्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी दक्षिण भारतीय सुपरस्टार विजय देवरकोंडा त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लाइगर’ चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला. यादरम्यान विजयने इरफान पठाण, वसीम अक्रम आणि मयंती लँगर यांच्याशी क्रिकेटविषयी संवाद साधला. अभिनेत्याचा देसी लूक पाहून सगळेच वेडे झाले. मैदानावर कुर्ता पायजमातील विजयचा स्वॅग पाहून चाहते नव्याने त्याच्या प्रेमात पडले. विजयला पाहताच सगळे राऊडी-राउडी ओरडू लागले.

विजयने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकेटबद्दलची आवडही व्यक्त केली. विजयने सांगितले की, कॉलेजच्या काळात टीव्ही नसताना कोणाकडून तरी रेडिओ घ्यायचा आणि हॉस्टेलच्या छतावर जाऊन भारत-पाकिस्तान सामन्याची कॉमेंट्री ऐकत असे. सध्या विजयचे स्टेडिअममधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेही वाचा -  Urvashi Rautela Rishabh Pant: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पोहचली उर्वशी, सोशल मीडियावर ट्रेंड होतोय ऋषभ पंत T20 एशिया कप 2022 दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी दिली आहे. या सामन्यात टीम इंडियाने ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. तर विराट कोहली आणि केएल राहुल याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या