मुंबई, 28 ऑगस्ट: आशिया चषक 2022 ला सुरुवात झाली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषकाचा दुसरा सामना दुबईत खेळला जात आहे. हा सामना पाहण्यासाठी राजकारणापासून बॉलिवूडपर्यंतचे स्टार्स पोहोचले आहेत. अशातच बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये दिसली. मग काय सोशल मीडियावर एकच चर्चा. उर्वशीचे अनेक फोटो आणि मीम्सने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधलं आहे. जेव्हा उर्वशी रौतेला दुबई स्टेडियमवर दिसली तेव्हाच सगळीकडे तीचे फोटो व्हायरल झाले. या मॅचमध्ये ऋषभ पंत खेळणार नसला तरी उर्वशीच्या स्टेडीअममधल्या हजेरीनं सोशल मीडियावर उर्वशीच्या नावाचा आणि सोबतच एक्स बॉयफ्रेंड ऋषभ पंतच्या नवाचाही ट्रेंड पहायला मिळाला. उर्वशी आणि रौतेला ही ऋषभ पंतची एक्स गर्लफ्रेंड असल्यानं दोघेही कायम वादात असलेले पहायला मिळतात.
अलीकडेच पंत आणि उर्वशी सोशल मीडियावर एकमेकांशी भिडले. पंतने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी टाकून उर्वशीचे नाव न घेता उर्वशीला फॉलो करणे थांबवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर उर्वशीने इंस्टाग्रामवर एक पोस्टही केली. यातही तिनं पंतचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. नुकताच उर्वशीने पुन्हा एकदा ऋषभ पंतवर निशाणा साधला आहे. उर्वशीची एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने कॅप्शन लिहिले आहे, मी माझी बाजू न सांगून तुमची प्रतिष्ठा वाचवली आहे. दरम्यान, पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी दिली आहे. तर विराट कोहली आणि केएल राहुल याचं टीम इंडियामध्ये पुनरागमन झालं आहे.