लंडन, 16 सप्टेंबर : इंग्लंडमध्ये झालेल्या अशेस मालिकेत तब्बल 43 वर्षांनी पहिल्यांदाच मालिका अनिर्णीत राहिली. पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात इंग्लंडनं 135 धावांनी विजय मिळवला. याआधी लॉर्ड्सवर झालेला सामनाही अनिर्णीत झाला होता. या मालिकेत दोन्ही संघाकडून एकमेकांविरोधात चांगला क्रिकेटचा खेळ खेळला गेला. पहिला कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं 251 धावांनी विजय मिळवला. मात्र या मालिकेत खेळाडूंच्या खेळाबरोबरच वादांमुळेही ही मालिका गाजली. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत स्टीव्ह स्मिथनं चांगली कामगिरी केली. मात्र मैदानाबाहेर झालेल्या एका गोष्टीमुळं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वादंग निर्माण झाले आहेत. ओव्हलच्या मैदानावर झालेल्या अंतिम कसोटी सामन्यात एकीकडे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेडची पंचांसोबत बाचाबाची झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरला बेन स्टोकनं चक्क लाईव्ह सामन्यात शिव्या घातल्या. याबाबत ब्रिटीश पत्रकार इजाबेल वेस्टबरी यांनी ट्वीट केले. वेस्टबरी यांनी, “तिसऱ्या दिवशी उपहारानंतर मैदानातून बाहेर जाताना स्टोक्सनं वॉर्नरला शिवी घातली”, असे ट्वीट केले. मायक्रोफोनमध्ये झालेल्या रेकॉर्डमुळं नवा वाद या सगळ्या प्रकरणानंतर मैदानात असलेल्या स्टम्प जवळच्या मायक्रोफोनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बेन स्टोक्सला प्रतिउत्तर दिल्याचे ऐकू येत आहे. यात ऑस्ट्रेलियाचा खेळाडू 2017मध्ये ब्रिस्टल येथील नाईटक्लबमध्ये घडलेल्या घटनेवर होता. या सगळ्या प्रकरणात बेन स्टोक्स अडकला बोता. तर, दुसरीकडे वॉर्नरला चेंडू कुडतडल्याप्रकरणी एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये वॉर्नर सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता.
वाचा- इंग्लंडचा 135 धावांनी विजय! अॅशेस मालिका बरोबरीत मॅथ्यू वेडनं व्यक्त केला राग या सगळ्या प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मॅथ्यू वेड मैदानावरील आपल्या वागणुकीवरून चर्चेत होते. यामुळं पंचांकडून वॉर्नरला इशाराही मिळाला होता. वाचा- चांगलं खेळा नाही तर संघाबाहेर बसा! कॅप्टन कोहलीनं ‘या’ खेळाडूंना दिली सक्त ताकिद पाचव्या कसोची मालिकेत इंग्लंडचा विजय इंग्लंडनं दिलेल्या 399 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्यापुढे स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाच्या अन्य फलंदाजांनीसुद्धा शरणागती पत्करली. त्यामुळे पाचव्या अॅशेस कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवसीच ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला. ऑस्ट्रेलिया सर्वात मोठा झटका तेव्हा बसला जेव्हा 27वया ओव्हरमध्ये स्मिथची विकेट गेली. या मालिकेत पहिल्यांदा स्मिथ 50 पेक्षा कमी धावा करत बाद झाला. तत्पूर्वी इंग्लंडचा शनिवारचा 8 बाद 313 धावांवरून पुढे खेळताना दुसरा डाव 329 धावांवर संपुष्टात आला.त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 399 धावांचे अशक्यप्राय असे आव्हान उभे केले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातच भरवशाच्या स्मिथला त्याने 23 धावांवर लेग स्लीपमध्ये उभ्या असलेल्या बेन स्टोक्सकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतरही मिचेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी पाचव्या गडय़ासाठी 63 धावांची भागीदारी रचली. मात्र मार्श लगेच बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोसळला. वाचा- अफगाणिस्तानचा विश्वविक्रम, स्वत:लाच मागे टाकून रचला अनोखा इतिहास VIDEO: आज दिवसभरात घडाणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या टॉप 18 न्यूज, पाहा झटपट