टीम इंडियाचं बिझी शेड्यूल... पाहा, कोण कोण येणार भारत दौऱ्यावर?
मुंबई, 04 ऑगस्ट: येत्या महिनाअखेर संयुक्त अरब अमिरातीत आशिया चषक स्पर्धा सुरु होणार आहे. पण त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन संघ भारत दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान सहा ट्वेन्टी ट्वेन्टी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियात आयसीसीचा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक असल्यानं टीम इंडियाचं हे वेळापत्रक भलतंच व्यस्त झालं आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन संघ टी20 मालिकेसाठी भारतात येणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील हे सामने नागपूर, मोहाली आणि हैदराबादमध्ये खेळवण्यात येतील. ही मालिका संपताच टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करेल. पाहुण्या संघाविरुद्धही तीन टी20 आणि तीन वन डे सामने खेळवले जातील. असा असेल ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा भारत वि. ऑस्ट्रेलिया**:** 20 सप्टेंबर, पहिली टी20 (मोहाली) 23 सप्टेंबर, दुसरी टी20 (नागपूर) 25 सप्टेंबर, तिसरी टी20 (हैदराबाद) भारत वि. दक्षिण आफ्रिका**:** 28 सप्टेंबर, पहिली टी20 (तिरुअनंतपूरम) 2 ऑक्टोबर, दुसरी टी20 (गुवाहाटी) 4 ऑक्टोबर, तिसरी टी20 (इंदूर) भारत वि. दक्षिण आफ्रिका**:** 6 ऑक्टोबर, पहिली वन डे (लखनौ) 9 ऑक्टोबर, दुसरी वन डे (रांची) 11 ऑक्टोबर, तिसरी वन डे (दिल्ली) हेही वाचा - IND vs WI: टीम इंडियानं टाकला सुटकेचा निश्वास… पाहा, नक्की काय घडलं? टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयची पूर्वतयारी दरम्यान 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषकाचं आयोजन केलं जातंय. त्यामुळे या विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीनं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणारी आगामी टी20 सामन्यांची मालिका महत्वाची ठरणार आहे. याच मालिकेनंतर बीसीसीआयची निवड समिती विश्वचषकासाठीचा संघ जाहीर करेल असा अंदाज आहे. आशिया चषकानंतर लगेचच या मालिकेचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे विश्वचषकाआधी खबरदारी म्हणून रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रीत बुमरासारख्या महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती दिली जाण्याचीही शक्यता आहे. वर्षअखेरपर्यंत टीम इंडिया व्यस्त या मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या विश्वचषकानंतरही भारतीय खेळाडूंना उसंत मिळणार नाही. कारण त्यानंतरही न्यूझीलंडविरुद्ध वन डे आणि टी20, बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी आणि त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध वन डे आणि टी20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियासाठी हे व्यस्त वेळापत्रक असलं तरी क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र डिसेंबरपर्यंत सामन्यांची मोठी मेजवानी मिळेल हे मात्र नक्की.